खेड-न्याय देण्यासाठी मोदी, फडणवीसांचे नेतृत्व हवे
-rat५p१९.jpg-
२५O०२६२५
खेड ः स्व. मीनाताई ठाकरे नाट्यगृहात आयोजित संवाद मेळाव्यात बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण.
------
पक्षबळकटीसाठी कुटुंब म्हणून काम करूया
रवींद्र चव्हाण ः खेडमध्ये भाजपाचा कार्यकर्ता संवाद मेळावा
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ५ : नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय द्यायचा असेल तर केंद्रातील नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यातला द्रष्टा नेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व मानणे गरजेचे आहे. एक परिवार, एक कुटुंब म्हणून पक्षाला बळकटीसाठी काम करूया, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी केले आहे.
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी शहरातील स्व. मीनाताई ठाकरे नाट्यगृहात बुधवारी आयोजित केलेल्या कार्यकर्ता संवाद मेळावा व पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, तालुकाध्यक्ष विनोद चाळके, ऋषिकेश मोरे, माजी जिल्हाध्यक्ष केदार साठे, माजी आमदार विनय नातू व सूर्यकांत दळवी, प्रशांत यादव आदी उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले, गेली काही वर्षे मनसेत नेते म्हणून अतिशय चांगले काम करणाऱ्या खेडेकर यांचे सामाजिक काम खेडच नव्हे तर कोकणवासियांना ज्ञात आहे. पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपणास काम करण्याची संधी मिळावी, अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली. त्यांना नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांना पक्षात घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आपल्यासोबत माझे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपबरोबर जोडू इच्छित असल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर आज हा कार्यकर्ता संवाद मेळावा व पक्षप्रवेश सोहळा घेण्यात आला.
एक परिवार, एक कुटुंब म्हणून पक्षाला बळकटीसाठी काम करूया. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. या वेळी नागरी सुविधा, समस्या आणि ज्या बाबी नागरिकांच्या हिताच्या असतील त्या पूर्णत्वास नेण्यासाठी एकविचाराने पुढे गेले पाहिजे. राजकारण राजकारणाच्या जागीच असू शकते; पण नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय द्यायचा असेल तर मोदी, फडणवीस यांचे नेतृत्व मानणे गरजेचे असून, जो विश्वास आपण लोकांना देणार आहोत. त्याला तडा न देता नागरिकांना सुविधा देण्यास कटिबद्ध राहिले पाहिजे, असे चव्हाण यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

