-क्राईम
गुटखा साठाप्रकरणी
एकावर गुन्हा
मंडणगड ः विमल पानमसाला व सुगंधी तंबाखूचा साठा केल्याप्रकरणी एका विरुद्ध मंडणगड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शशिकांत नामदेव कपडेकर (वय ५६, रा. भिंगळोली, दापोली फाटा) या संशयिताने विक्रीच्या उद्देशाने प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी मंडणगड पोलिस ठाण्यात अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित भोसले यांच्या फिर्यादीनुसार, ४ नोव्हेंबरला दुपारी शहरातील एका दुकानात छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान, पोलिसांनी एकूण १५ पाकिटे केसरीयुक्त पानमसाला (किंमत ३१६८) व १६ पाकिटे चॉकलेटी रंगाचे तंबाखू (किंमत ३५२) असा एकूण ३५२० किमतीचा साठा जप्त केला.
रहदारीस अडथळा
प्रकरणी गुन्हा
मंडणगड ः वेसवीनाक्यावर धोकादायक स्थितीत वाहन उभे केल्याप्रकरणी परशुराम असरफी (वय ६०, मूळ रा. खस, बस्ती, उत्तरप्रदेश; सध्या रा. मंडणगड) यांच्या विरोधात बाणकोट सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ४ नोव्हेंबरला करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक विष्णू पारधी यांनी फिर्याद दिली. वेसवीनाका येथे वेसवी-मंडणगड या सार्वजनिक रस्त्यावर परशुराम असरफी यांनी तीनचाकी वाहन सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, अशा धोकादायक स्थितीत उभे केले होते. या कृतीमुळे ये-जा करणाऱ्या वाहनचालकांसह पादचाऱ्यांना देखील अडचण निर्माण झाली.
अमली पदार्थ सेवन
करणाऱ्यास अटक
चिपळूण ः खेर्डी येथील गणपती विसर्जन घाट येथे नदीकिनारी एकाला अमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. ४ नोव्हेंबरला दुपारी हा प्रकार निदर्शनास आला. चिपळूण पोलिस ठाण्यातील कर्मचारी रोशन शंकर पवार यांनी या संदर्भात तक्रार दिली. खेर्डी-शिगवणवाडी येथील सुनील लक्ष्मण आरवट (वय ५०, रा. खेर्डी शिवगणवाडी) हा खेर्डी गणपती विसर्जन घाट येथे नदीच्या किनारी झाडाखाली बसून बेकायदेशीररीत्या गांजासदृश अमली पदार्थाचे सेवन करत असताना आढळून आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

