आंबा बागायतदारांना नुकसान भरपाई द्या

आंबा बागायतदारांना नुकसान भरपाई द्या

Published on

-rat५p१४.jpg-
२५O०२६१३
रत्नागिरी ः अवकाळी पावसामुळे आंबा हंगामात कलमांना पालवी फुटली असून, ती कोमेजू लागली आहे. रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे दाखवताना आंबा बागायतदार.
-rat५p१५.jpg-
२५O०२६१४
मोहोरावर मोठ्या प्रमाणात पडलेला तुडतुडा रोग.
----------
आंबा बागायतदारांना भरपाई द्या
प्रकाश साळवी ः शेतकऱ्यांची कर्जे माफ करा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ : पावसाने आंबा, काजू बागायतदार पुरता कोलमडला आहे. ऑक्टोबर हीट न मिळाल्याने हापूस कलमांची पालवी कोमेजली आहे. तुडतुडा, बुरशीजन्य रोगाचाही प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे यंदा आंबापिक कमी होणार असून, हंगामही लांबेल. त्यात सिबिल स्कोअरमुळे बॅंका बागायतदारांना कर्जासाठी उभ्या करत नाहीत. देश-परदेशात नाव असलेल्या फळांचा राजा हापूस संकटात आहे; परंतु शासन याकडे दुर्लक्ष करत आहे. शासनाने आंबा बागायतदारांचे दु:ख जाणून घेऊन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा हापूस आंबा उत्पादक संघाचे प्रकाश (बावा) साळवी यांच्यासह अन्य संघटना मच्छीमारांनी केली.
येथील हॉटेल विवेकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी टी. एस. घवाळी, दीपक उपळेकर, अशोक भाटकर,
राजेंद्र कदम, रामचंद्र मोहिते, सदाशिव पाचकुडे, शोएब काझी, नितीन पाचकुडे, अनिल शेलार, अरुण मांडवकर, अनंत आग्रे आदी उपस्थित होते. साळवी म्हणाले, ५ मे पासून सुरू झालेला पाऊस सहा महिने झाले तरीही थांबलेला नाही. हवामानखात्यानेही पाऊस डिसेंबरपर्यंत राहण्याची शक्यता वर्तवली आहे. पाऊस सर्वत्रच पडत असून, त्याचा फटका सरसकट सर्व शेतकऱ्यांना बसलेला आहे. सरकारने पंचनामे करण्यात वेळ न घालवता त्वरित नुकसान भरपाई अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावी. बदलत्या वातावरणामुळे यंदाचा आंबा हंगाम वाया जाण्याची शक्यता आहे. याचा सरकारने विचार करून शेतीतज्ज्ञांच्या सल्ल्याने शेतकऱ्यांना यापूर्वीची सर्व कर्जमाफी करावीत आणि पुढील हंगामासाठी नवीन कर्ज द्यावीत तरच शेतकऱ्याला भविष्यातील आपत्तीला तोंड देता येईल, अशी मागणी बागायतदारांनी केली आहे.
दरम्यान, मच्छीमार बांधवांच्या नौकादेखील किनारावर अडकल्या असून, त्यांचे होणारे नुकसान शासनाने त्वरित द्यावे. पालकमंत्री उदय सामंत यांनीही हा विषय सभागृहात घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून प्रयत्न करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
---
चौकट
कोकण कृषी विद्यापीठ कुचकामी
पश्चिम महाराष्ट्रातील वापरली जाणारी औषधे जिल्ह्यातील आंबा बागायतदार रोगराईवर नियंत्रण आणण्यासाठी वापरत आहे. वास्तविक आंबा, काजूसाठी स्वतंत्र असे कोणतेही औषध नाही आणि त्यासाठी संशोधन होत नाही. त्यामुळे कोकण कृषी विद्यापीठाच्या शेतकरी, बागायतदारांना काडीचाही उपयोग होत नाही. त्या अनुषंगाने विद्यापीठाने काम करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा बागायतदारांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com