जिल्ह्यात ११,६५७ शेतकऱ्यांचे सव्वाकोटीचे नुकसान
-rat५p२१.jpg-
२५O०२६३८
रत्नागिरी ः पावसाने भातपिक भिजल्याने उत्पादनात घट होणार आहे.
-------
जिल्ह्यात ११ हजार ६५७ शेतकऱ्यांना फटका
पावसामुळे सव्वाकोटींचे नुकसान ; कृषी विभागाकडून पंचनामे सुरू
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ ः रत्नागिरी जिल्ह्यात १ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान पडलेल्या पावसामुळे ११ हजार ६५७ शेतकऱ्यांचे २ कोटी १९ लाखांचे नुकसान झाले आहे. त्यात सर्वाधिक भातपिक बाधित झालेले असून, उत्पादनातही मोठी घट होण्याची शक्यता आहे.
वादळी परिस्थितीमुळे मागील पंधरवड्यात रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस पडला. त्याचा फटका भातशेतीला बसलेला आहे. जिल्ह्यात ५५ हजार ५५१ हेक्टर क्षेत्रावर भात, नाचणी पिकांची लागवड झाली आहे. त्यात भाताचे क्षेत्र सुमारे ४६ हजार हेक्टरइतके आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यापर्यंत ६० टक्केहून अधिक भातकापणी पूर्ण झाली होती. उर्वरित क्षेत्रातील कापण्यांचा वेग पावसामुळे मंदावला. काही ठिकाणी कापलेलं भात भिजून गेले. ऐन दिवाळीत सुमारे २० टक्के भातक्षेत्र पावसाच्या तडाख्यात सापडले. भिजलेली भातरोपं कुजली तर काही ठिकाणी भाताचे दाणे वाया गेले. सलग दोन दिवस पाऊस पडत राहिल्याने भात पुन्हा रुजून आले. काही ठिकाणी उभी भातं आडवी झाली. झालेल्या नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाकडून सुरू आहेत.
कोकणात शेतकरी पारंपरिक पद्धतीने वर्षभर पुरेल इतका तांदूळ मिळवण्यासाठी भातशेती करतात; मात्र, यावर्षी पावसाने मोठे नुकसान केले आहे. भातानंतर घेण्यात येणारी पावटा, तूर, कडवा आदी पिकांची पेरणीही हवामान अनुकूल नसल्याने धोक्यात आली आहेत. १ ते ३१ ऑक्टोबर या एका महिन्यातील पावसामुळे ९५८ गावे बाधित झाली असून, २ हजार २१३ हेक्टरवर भातपिकांचे नुकसान झाले आहे. ११ हजार ६५७ शेतकरी बाधित झाले असून, २ हजार ५७३ हेक्टरवरील क्षेत्राचे नुकसान झालेले आहे. त्यात भाताचे २४६२ हेक्टर, नाचणी १.०९ हेक्टर, भाजीपाला ४.९१ हेक्टर नुकसान झाले आहे. ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे भातपिकांच्या उत्पादनात घट निश्चित झाली आहे. जिल्ह्याचे भातामधील उत्पादन हेक्टरी ३२ क्विंटल आहे. पावसामुळे त्यात हेक्टरी ३ ते ४ क्विंटल घट होईल, असा अंदाज आहे.
-------
कोट १
रत्नागिरी जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसामुळे भातपिकांचे नुकसान झाले असून, पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. नुकसान भरपाईसाठीच प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे.
- शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रत्नगिरी
-------
चौकट
जिल्ह्यातील स्थिती
तालुका* शेतकरी* बाधित क्षेत्र (हेक्टर)* नुकसान
मंडणगड* ११९८* २५२* २१ लाख ४२ हजार
दापोली* ७१५* १३५* ११ लाख ५२ हजार
खेड* १७०२* ५०३* ४२ लाख ७५ हजार
चिपळूण* १५९९* ४००* ३४ लाख
गुहागर* ४५९* ८४* ७ लाख ७७ हजार
संगमेश्वर* १०५०* ३०२* २५ लाख ६७ हजार
रत्नागिरी* १३००* ३२५* २७ लाख ६२ हजार
लांजा* २१४२* ३६६* ३१ लाख १८ हजार
राजापूर* १४९२* २०३* १७ लाख २८ हजार
----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

