रत्नागिरीत आजपासून साहित्यिक- सांस्कृतिक दिवाळी
- rat६p१६.jpg-
२५O०२७८०
रत्नागिरी ः मुकुंद संगोराम, गिरीश कुलकर्णी, माधुरी पुरंदरे, भारती आचरेकर, मंगला गोडबोले, शुभांगी दामले, कौशल इनामदार.
सुनीता देशपांडे जन्मशताब्दी उपक्रम --------लोगो
रत्नागिरीत आजपासून साहित्यिक- सांस्कृतिक दिवाळी
आर्ट सर्कल; पटवर्धन हायस्कूल, सावरकर नाट्यगृहात कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ : लेखिका व रत्नागिरीच्या माहेरवाशीण सुनीता देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त उद्यापासून (ता. ७) ते रविवारपर्यंत (ता. ९) तीन दिवस रत्नागिरीत साहित्यिक व सांस्कृतिक दिवाळी साजरी होणार आहे. आर्ट सर्कलने राज्य मराठी विकास संस्था, मराठी भाषा विभागाच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन केले आहे. सर्व कार्यक्रम विनामूल्य असून पटवर्धन हायस्कूल आणि स्वा. सावरकर नाट्यगृहात हे कार्यक्रम रंगणार आहेत. तीनही दिवस या सर्व उपक्रमांना प्रवेश विनामूल्य आहे.
पटवर्धन हायस्कूलच्या ठाकूर सभागृहात ७ व ८ रोजी या सकाळी १०.३० वा. अभिवाचन स्पर्धेचे उद्घाटन अभिनेत्री शुभांगी दामले, लेखिका नीता कुलकर्णी, दिग्दर्शक मंगेश सातपुते यांच्या हस्ते होईल. शालेय, महाविद्यालयीन आणि खुल्या गटात होणारी ही स्पर्धा दिवसभर चालेल. ७ रोजी स्पर्धा संपल्यानंतर शुभांगी दामले या ‘आहे मनोहर तरी’ पुस्तकातील काही भागाचे अभिवाचन करतील. ८ रोजी स्पर्धा संपल्यानंतर ज्येष्ठ रंगकर्मी उदय पंडित अभिवाचन करतील. ७ रोजी सायंकाळी ७ वा. वाजता नाट्यगृहात पु. ल. देशपांडे लिखित मॅड सखाराम आणि त्यानंतर पु. लं. च्या साहित्यावर आधारित मुकेश माचकर मराठी वाङ्मयाचा घोळीव इतिहास असे दोन दीर्घांक सादर होणार आहेत. ८ रोजी ‘रूंग्ली रूंग्लीयॉट’ हा अभिवाचनाचा कार्यक्रम सायंकाळी ७ वा. सावरकर नाट्यगृहात होईल.
समारोपाच्या दिवशी ९ नोव्हेंबरला सकाळी १० वाजल्यापासून कार्यक्रमांना सुरुवात होईल. कवी आणि लेखक किरण येले सुनीताबाईंच्या आत्मचरित्राच्या वेगळेपणाबद्दल बोलतील. लेखक प्रवीण बांदेकर आहे मनोहर तरी-खूप काही आहे यावर बोलतील. संगीतकार कौशल इनामदार कवितेचे विभ्रम सादर करतील. सुप्रसिद्ध कवी वैभव जोशी केशरी प्रहरमधून कविता सादर करतील. लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते किरण यज्ञोपवित ‘सुनीताबाई आणि नाटक’ या विषयावर बोलतील. मुखपृष्ठ करणारे चित्रकार बाळ ठाकूर यांच्या ३०० पुस्तकांचे व रेखाचित्रांचे प्रदर्शन, छोटेखानी पुस्तक प्रदर्शनही नाट्यगृहात भरवण्यात येणार आहे.
----
चौकट
अनुभव कथन
सुनीता देशपांडे यांचा सहवास लाभलेल्या लेखिका मंगला गोडबोले ‘सुनीता देशपांडें’बद्दल बोलतील. लेखक मुकुंद संगोराम यांनी सुनीताबाईंच्या पुस्तक लेखन, प्रकाशनासाठी सहाय्य केले होते. तेसुद्धा बोलणार आहेत. अभिनेत्री भारती आचरेकर या पुलंचे किस्से आणि सोबत गाणी असे मिश्र सादरीकरण करतील. पुलंच्या कुटुंबातील सदस्य, पुतण्या जयंत देशपांडे आणि सुनीताबाईंच्या माहेरचे संतोष ठाकूर आणि अन्य भाचवंड ‘भाई काका आणि सुनीता आत्या’ यांच्याबद्दल बोलतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

