सावंतवाडीत फुलले गीत-नृत्याचे ''चांदणे''
swt615.jpg
02807
सावंतवाडीः ‘हे चांदणी फुलांनी’ कार्यक्रमात सहभागी कलावंतांसह गुरुवर्य नीलेश मेस्त्री, किशोर सावंत आदी.
सावंतवाडीत फुलले गीत-नृत्याचे ‘चांदणे’
‘हे चांदणे फुलांनी’ उत्साहातः हिंदी-मराठी गीतांनी रसिक मंत्रमुग्ध
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ६ ः श्री सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ, सावंतवाडी नगरपरिषद यांच्यावतीने व भाजप नेते विशाल प्रभाकर परब यांच्या माध्यमातून सलग आठव्या वर्षी खास त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त गुरुवर्य नीलेश मेस्त्री यांच्या निर्मिती-संकल्पनेतून ‘हे चांदणे फुलांनी... जुन्या-नव्या हिंदी-मराठी गीतांचा सदाबहार नजराणा’ या संगीत कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी (ता. ५) सायंकाळी ६ वाजता येथील जनरल जग्गनाथराव भोसले शिवउद्यान येथे केले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीपाद चोडणकर, मंजिरी धोपेश्वरकर, सोमा सावंत व वैभव केंकरे यांच्या हस्ते दीपप्रजवलन व श्रीफळ वाढवून करण्यात आले. विद्यालयाचा माजी विद्यार्थी व ‘कलर्स मराठी गौरव महाराष्ट्राचा’ फेम सागर मेस्त्री यांच्या सोबतच विद्यालयाच्या वर्षा देवण-धामापूरकर, ॲड. सिद्धी परब, समृद्धी सावंत, मधुरा खानोलकर, केतकी सावंत, निधी जोशी, नितीन धामापूरकर, भास्कर मेस्त्री या विद्यार्थ्यांनी मोसे छल किये जाये, निगाहे मिलाने को जी चाहता है, प्यार हुआ इकरार हुआ, सलामे इष्क, मी वाऱ्याच्या वेगाने आले, सोचेंगे तुम्हे प्यार, मल्हार वारी, प्रीतीच्या चांद राती, राधा ही बावरी यांसारखी एकाहून एक सरस गीते सादर करत रसिकांना खिळवून ठेवले. पूजा सावंत यांच्या नृत्याने वन्स मोअर मिळवत कार्यक्रमास अधिकच रंगत आणली.
या कार्यक्रमाला साथसंगत नीलेश मेस्त्री (हार्मोनियम), किशोर सावंत व सिद्धेश सावंत (तबला), नीरज भोसले (तबला/ढोलक), अश्विन (गुड्डू) जाधव (ऑक्टोपॅड), मंगेश मेस्त्री (सिंथेसायझर), दुर्वा सावंत (गिटार) व सूत्रसंचालन संजय कात्रे, तर ध्वनी संयोजन सुभाष शिरोडकर यांनी केले. सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांनी या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवत सर्व कलाकारांना दाद दिली व कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, हेमंत खानोलकर, सोमा सावंत, तानाजी सावंत, गोविंद मळगावकर यांचे विशेष सहकार्य लाभले. मालवणी कवी दादा मडकईकर, डॉ. गोवेकर, विनोद गावकर, सुधीर धुमे, अरुण मेस्त्री, उत्कर्षा मेस्त्री, मानसी भोसले, डॉ. संगीता तुपकर, पूजा दळवी, सरिता सावंत, अनामिका मेस्त्री यांच्यासह अनेक मान्यवर मंडळींनी व जिल्हाभरातील रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

