उद्योगमंत्री सामंत यांचा उद्या कुडाळात सत्कार
उद्योगमंत्री सामंत यांचा
आज कुडाळात सत्कार
कुडाळः येथील एमआयडीसीच्या विकासात उद्योगमंत्री उदय सामंत यांचे गेल्या तीन वर्षांत मोठे सहकार्य मिळाले आहे. त्यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनच्यावतीने शनिवारी (ता.८) सकाळी ९ ते ११ या वेळेत येथील बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेच्या सभागृहात त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर व सेक्रेटरी अॅड. नकुल पार्सेकर यांनी दिली. यावेळी माजी अध्यक्ष आनंद बांदिवडेकर, शशिकांत चव्हाण, कुणाल वरसकर आदी उपस्थित होते. श्री. होडावडेकर म्हणाले, "आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सत्कार सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून आमदार दिपक केसरकर, भारत विकास ग्रुपचे अध्यक्ष व प्रख्यात उद्योजक हणमंतराव गायकवाड, रवींद्र माणगावे, आशिष पेडणेकर आदी उपस्थित राहणार आहेत. पहिल्या सत्रात सकाळी ९ वाजता उद्योजक गायकवाड यांचे उद्योजकांसाठी व्याख्यान होणार आहे. दुसऱ्या सत्रात १० वाजता उद्योग मंत्री सामंत व मान्यवरांच्या उपस्थितीत दिपप्रज्वलन सोहळा, बुजुर्ग यशस्वी उद्योजक व विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या उद्योजकांचा सन्मान, गुणवंत कामगार पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे."

