पर्यावरण दिंड्याद्वारे १ लाख १० हजार झाडांची लागवड
- rat७p६.jpg-
P२५O०२९४३
ओल्ड गोवा ः येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते महिलांना शिवणयंत्रांचे वाटप करण्यात आले. मध्यभागी रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी. (छाया ः सचिन सावंत)
---
उपासना, उपक्रम अन् पर्यावरणाची साखळी
मुख्यमंत्री सावंत ः पर्यावरण दिंड्यातून १ लाख झाडांची लागवड
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ ः रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांचे सामाजिक कार्य मोठे आहे. गोरगरिबांना मदत, संस्कृतीचे जतन करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यांच्या प्रेरणेने निघालेल्या पर्यावरण दिंड्याद्वारे ३० दिवसांत एक लाख १० हजार झाडे लावण्यात आली. हे काम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.
रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या ओल्ड गोवा येथील उपपिठावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त झालेल्या वारीउत्सवात ते बोलत होते. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या उपस्थितीत उत्सवासाठी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी उपपिठावर महाराजांचे दर्शन घेतले. त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयावर संवाद साधला. मुख्यमंत्री, संतमहंत व उपस्थित नामवंतांच्या हस्ते या वेळी २१ शिवणयंत्रांचे वितरण करण्यात आले. गरजू महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही शिवणयंत्रे मोफत देण्यात आली. या प्रसंगी मुख्यमंत्री सावंत म्हणाले, ओल्ड गोव्याच्या पुण्यभूमीत नरेंद्रचार्यंचे मोठे काम सुरू आहे. गोव्याची ओळख सनसँड अँड सीबरोबर स्पिरिच्युअल गोवा अशी होत आहे. त्यात रामानंदाचार्य नरेंद्राचार्यंचे मोठे योगदान आहे. येत्या शिवरात्रीला मोठा उत्सव होणार आहे. त्यासाठी गोवा सरकार सर्व ते सहकार्य करेल. पर्यावरण रक्षण, रक्तदान, मरणोत्तर देहदान, अवयवदान असे कितीतरी उपक्रम त्यांच्या कार्याची साक्ष देतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

