कुडाळकर हायस्कूलच्या
महिमा मोहीतेची ''हॅट्रिक''

कुडाळकर हायस्कूलच्या महिमा मोहीतेची ''हॅट्रिक''

Published on

03076

कुडाळकर हायस्कूलच्या
महिमा मोहितेची ‘हॅट्रिक’

मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये यश

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ७ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने घेण्यात आलेल्या शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये महिमा मोहिते (सातवी) हिने १०० मीटर, २०० मीटर धावणे व लांब उडी या तिन्ही प्रकारात निर्विवाद वर्चस्व गाजवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला.
या कामगिरीच्या जोरावर तिने डेरवण, चिपळूण (रत्नागिरी) येथे झालेल्या कोल्हापूर विभागीय शालेय मैदानी स्पर्धेत थरारक प्रदर्शन करत रेकॉर्डब्रेक कामगिरी साकारली. तिन्ही प्रकारात सुवर्णपदक जिंकत तिने हॅट्रिक साधली असून आजवरच्या विभागीय स्पर्धेत अशी हॅट्रिक करणारी ती पहिलीच बालगटातील खेळाडू ठरली आहे. ती श्री सद्गुरू सदानंद माऊली एज्युकेशनल फाउंडेशन संचलित डॉ. श्रीधर सिताराम कुडाळकर हायस्कूल, मालवण प्रशालेत शिकत आहे. येत्या १२ नोव्हेंबरला होणाऱ्या महाराष्ट्र राज्य शालेय मैदानी स्पर्धेत ती कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे. तिच्या यशाबद्दल श्री सद्गुरू सदानंद माऊली एज्युकेशनल फाउंडेशनचे अध्यक्ष विलास झाड, कार्याध्यक्ष कृष्णा बांदेकर, उपाध्यक्ष भालचंद्र राऊत, सचिव महेश मांजरेकर, खजिनदार विलास निवेकर, मुख्याध्यापिका नंदिनी साटलकर, प्राची परब तसेच सर्व शिक्षकांनी तिचा सत्कार करून अभिनंदन केले. या उज्ज्वल कामगिरीच्या मागे क्रीडा शिक्षक अजय शिंदे, प्रशिक्षक अनिकेत पाटील तसेच पालक स्वीटी मोहिते व विशाल मोहिते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com