-कृषी समृद्धी योजनेचा लाभ घ्या

-कृषी समृद्धी योजनेचा लाभ घ्या

Published on

कृषी समृद्धी योजनेचा लाभ घ्या
अभिजित शेलार ः प्रथम अर्ज करणाऱ्यांना प्राधान्य
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. ७ ः जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातर्फे शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी महत्त्वाकांक्षी कृषी समृद्धी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना सिंचन सुविधा, फलोत्पादन तसेच यांत्रिकीकरणासंबंधी अनुदान मिळणारा आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांची प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार निवड होणार आहे. त्यासाठी वेबसाइटवरून महाडीबीटी पोर्टलवर सीएसीद्वारे अर्ज करावेत, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अभिजित शेलार यांनी केले आहे.
समृद्धी योजनेसाठी अर्ज करण्याकरिता ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी आवश्यक आहे तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी कृषी विभागाने htts://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin या वेबसाइटचा उपयोग करा, असे आवाहन केले आहे. सिंचन सुविधा बाबींमधून शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक मोटरपंप, डिझेल किंवा पेट्रोल इंजिन, पाईपसंच पुरवठा, ठिबक सिंचन व तुषार सिंचनाकरिता अनुदान देण्यात येणार आहे. सिंचन संलग्न योजनेमधून ठिबक व तुषार सिंचनाकरिता २० गुंठे ते ५ हेक्टरपर्यंत लाभ घेता येईल. या अंतर्गत लहान व सिमांत शेतकरी, इतर शेतकरी व अनुसूचित जाती व जमातीमधील शेतकरी यांच्यासाठी मिळणाऱ्या अनुदानाची मर्यादा वेगवेगळी आहे. फलोत्पादन या बाबीमधून शेतकऱ्यांना हरितगृह, शेडनेट, मल्चिंग पेपर, वीडमॅट, पॅकहाऊस, फळप्रक्रिया केंद्र, आंबा पुनरूज्जीवन, रोपवाटिका उभारणी व औषधी, मसाला, फूलशेती क्षेत्रविस्तार याकरिता अनुदान मिळणार आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी शेलार यांनी दिली.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com