कला, क्रीडा स्पर्धांचा कुडाळात संगम

कला, क्रीडा स्पर्धांचा कुडाळात संगम

Published on

02987

कला, क्रीडा स्पर्धांचा कुडाळात संगम

‘कुडाळ देशकर’तर्फे महोत्सव; आज उद्योगमंत्र्यांची उपस्थिती, ८५० खेळाडूंचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ७ ः कुडाळ देशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या दहाव्या क्रीडा महोत्सवाला आज प्रारंभ झाला. या महोत्सवाची सुरुवात बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या दालनात साकारलेल्या कलादालनाच्या उद्‍घाटनाने झाली. चित्रकला, शिल्पकला आणि हस्तकला या विविध कलांनी सजलेले हे कलादालन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते खुले झाले. उद्या (ता.८) सकाळी साडेसात वाजता येथील हायस्कूल मैदानावर दहाव्या क्रीडा महोत्सवाचे औपचारिक उद्‍घाटन होणार असून उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती असेल.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष रणजीत देसाई, ज्येष्ठ उद्योजक जगदीश वालावलकर, कर्नाटक संस्था अध्यक्ष महेश ठाकूर, क्रीडा संघटक मनीष दाभोलकर आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत. विविध खेळांचे सामने सुरू होतील, तर रविवार, (ता.९) दुपारी अडीचला अंतिम सामना व बक्षीस समारंभ होईल. या वर्षीच्या कुडाळदेशकर प्रीमियर लीग (केपीएल) मध्ये महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकसह देश-विदेशातील सुमारे ८५० खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. तीन दिवस महोत्सवाला चालणार आहे.
यावर्षी प्रथमच समाजातील कलाकारांसाठी राष्ट्रीय स्तरावरील कला प्रदर्शन आयोजित केले आहे. ज्येष्ठ चित्रकार अरुण दाभोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकला, शिल्पकला आणि हस्तकलेच्या कलाकृती प्रदर्शित केल्या आहेत. कलादालनाच्या उद्‍घाटनावेळी स्वामी पूर्णानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. रणजीत देसाई, जगदीश वालावलकर, रमेश झारापकर, अरुण दाभोलकर, योगेश खानोलकर, विठोबा ठाकूर, गोपालकृष्ण प्रभू, सुरेश सामंत, अंजली सामंत, माधवी प्रभू, राजेंद्र नाईक, मनीष ठाकूर, उमेश गाळवणकर, केदार सामंत आदी उपस्थित होते.
---
संस्थेतर्फे समाजोपयोगी कार्यक्रम
रणजीत देसाई म्हणाले, ‘गौड ब्राह्मण सभा ही १८९७ मध्ये गिरगावात स्थापन झालेली समाजसेवी संस्था असून, समाजातील बंधुता, संस्कार, शिक्षण आणि ऐक्य वाढविण्यासाठी गेली १२८ वर्षे कार्यरत आहे. गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे, गरजूंसाठी वैद्यकीय सहाय्य, कन्यादान निधी वाटप आदी संस्थेच्या माध्यमातून होतात.’
----
आज ‘सबकुछ कुडाळदेशकर’
उद्या (ता.८) सायंकाळी ७ वाजता पु. ल. देशपांडे रंगमंच, बॅ. नाथ पै संकुल येथे ‘सबकुछ कुडाळदेशकर’ या नावाने भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आणि दशावतारी नाटकाचे सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमात व्यावसायिक व स्थानिक कलाकारांचा सहभाग असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com