‘वंदे मातरम’चे सामूहिक गायन
‘वंदे मातरम्’चे
सामूहिक गायन
रत्नागिरीः ‘वंदे मातरम्’ या गीतास आज दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात वंदे मातरम् गीताचे सामूहिक गायन झाले. या प्रसंगी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी अमर पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी उपस्थित होते.
-----
प्रचाराच्या वाहनांवर
झेंडे लावण्यास निर्बंध
रत्नागिरी ः राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीच्या प्रचारमोहिमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार तसेच निवडणूक लढवणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक हे निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर पक्षप्रचाराचे फलक लावणे, झेंडे लावणे आदी बाबींसाठी बंधन घालणे आवश्यक आहे. फिरत्या वाहनांवर पक्षप्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजूला विंड स्क्रिन ग्लासच्या पुढे राहणार नाही आणि तो त्या वाहनाच्या टपापासून २ फूट उंचीपेक्षा जास्त राहणार नाही. प्रचाराच्या फिरत्या वाहनांवर कापडी फलक वाहनचालकाच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजूने लावण्यात यावा, इतर कोणत्याही बाजूस तो लावता येणार नाही. फिरत्या वाहनांवर लावावयाचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेदवार व उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी निवडणूक प्रचारासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनांवर लावता येणार नाही.
------
वृत्तपत्र विद्यापदविकेत
राज पवारचे यश
गुहागर ः तालुक्यातील मासू येथील राज पवार याने ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था, नाशिक वृत्तपत्र विद्या पदविका अभ्यासक्रमांत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला. त्याला अगदी विद्यालयीन जीवनापासून लेखनाची आवड होती. पुढे महाविद्यालयीन जीवनात त्याने ही शैली जोपासली. कविता करणे, अनेक विषयांवर लेखन करणे हे त्याचे छंद आहेत. जिल्हास्तरावर, राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम, काव्यलेखन स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

