संयम, समर्पित भाव हीच शास्त्रीय गायनातील गुरुकिल्ली

संयम, समर्पित भाव हीच शास्त्रीय गायनातील गुरुकिल्ली

Published on

03040

संयम, समर्पित भाव हीच शास्त्रीय गायनातील गुरुकिल्ली

पंडित समीर दुबळे : वामनदाजी शास्त्रोक्त गायन स्पर्धेचे उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ७ : शास्त्रीय गायन क्षेत्रातले करियर करण्यासाठी केवळ अभ्यासक्रमाची हुशारी असून काम होत नाही. संयम, सातत्य, समर्पण आणि सतत नवीन काहीतरी करण्याची महत्वाकांक्षा हवी. योग्य गुरुकडून योग्य वेळी मिळालेली शास्त्रशुद्ध तालीम, रियाजाचं सातत्य, योग्य वेळी संधी मिळण्यासाठी राखलेला संयम आणि कलेप्रती समर्पित भाव हीच शास्त्रीय गायनातील गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन पंडित समीर दुबळे यांनी येथे केले.
येथील आचरेकर प्रतिष्‍ठानमध्ये आज वामनदाजी शास्त्रीय गायन स्पर्धेचे उद्‌घाटन पंडित रामशंकर (बनारस) यांचे हस्ते झाले. यावेळी संस्थेच्या सघनगान केंद्राचे गुरू पंडित समीर दुबळे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. या कार्यक्रमावेळी तबला वादन प्रशिक्षण केंद्राचे गुरू चारूदत्त फडके, संस्थेचे सुनिल पाटील‌, डॉ. समीर नवरे, सी.ए. दामोदर खानोलकर, कार्यवाह शरद सावंत, सीमा कोरगावकर, धनराज दळवी, राजा राजाध्यक्ष, अमीता कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नीलेश कोदे यांनी केले. उद्‌घाटन कार्यक्रमानंतर सघनगान केंद्राची विद्यार्थिनी सानिका गावडे हिचे गायन झाले.
---
‘संगीत चळवळ अखंडपणे चालविणे कठीण’
डॉ. दुबळे म्‍हणाले की, ‘शास्त्रीय संगीताची चळवळ अखंडपणे चालविणे कठीण आहे. कणकवली सारख्या छोट्या शहरात ते अधिक अवघड आणि आव्हानात्मक आहे. मात्र, आचरेकर प्रतिष्‍ठान हे आव्हान पेलत आहे म्हणून संस्थेचे नाव सर्वश्रुत आहे. संगीत साधना तपात १२ वर्षे मोजली जाते. एक तप, दोन तप, तीन तप झाल्‍यानंतर शास्त्रीय संगीत थोडेफार समजायला लागते.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com