कृषी मेळाव्यातून बळीराजाला नवतंत्रज्ञानाची ओळख

कृषी मेळाव्यातून बळीराजाला नवतंत्रज्ञानाची ओळख

Published on

03100


कृषी मेळाव्यातून बळीराजाला नवतंत्रज्ञानाची ओळख

मुळदे विद्यापीठाचा पुढाकार; वाफोलीत १४० शेतकऱ्यांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ८ ः शेतकऱ्यांच्या शेतीविषयक अडचणी सोडवून त्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे यांच्या ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत वाफोली येथे आयोजित भव्य कृषी मेळाव्याला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा मेळावा सहयोगी अधिष्ठाता डॉ. वि. वि. दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साही वातावरणात झाला.

मेळाव्यात तांत्रिक अधिकारी, क्षेत्रीय कृषी हवामानशास्त्र केंद्राचे डॉ. मुठाळ यांनी ‘हवामान अंदाज व हवामानावर आधारित कृषी सल्ला’ विषयावर मार्गदर्शन केले. तसेच सहयोगी प्राध्यापक डॉ. घुघुसकर यांनी ‘मत्स्य पालनातील आधुनिक तंत्रज्ञान’ विषयावर माहिती दिली. कार्यक्रमाला सरपंच उमेश शिरोडकर, उपसरपंच विनेश गवस, देवस्थान समिती अध्यक्ष विलास गवस, उपाध्यक्ष शिवाजी गवस, चेअरमन धनश्री गवस, व्हा. चेअरमन अनिल गवस, तंटामुक्ती अध्यक्ष सतीश गवस, पोलिसपाटील आना गवस, ग्रामपंचायत सदस्य मंथन गवस, माजी उपसभापती विनायक दळवी, तसेच कृषी सहाय्यक रसिका वसकर उपस्थित होत्या. बांदा मंडल कृषी अधिकारी युवराज भुईंबर यांनी शेतकऱ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आर्य मोरजकर, वैष्णव जगदाळे, संतोष घेराडे, यश वाघ, अथर्व देवळेकर व राज नाईक यांनी योगदान दिले.
---
शेतीविषयीचे मार्गदर्शन दिशादायी
मेळाव्यात हवामानावर आधारित शेती नियोजन, पीक व्यवस्थापन, तसेच मत्स्य पालनातील नव्या तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना मिळाली. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञानाविषयी जागरुकता वाढून मत्स्य पालनाकडे नव्या दृष्टीने वाटचाल करण्यास प्रोत्साहन मिळाले. १४० शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

Marathi News Esakal
www.esakal.com