निर्व्यसनी राहून आयुष्यातील रंग खुलवा

निर्व्यसनी राहून आयुष्यातील रंग खुलवा

Published on

03102

निर्व्यसनी राहून आयुष्यातील रंग खुलवा

डॉ. प्रसाद देवधर ः दोडामार्गात नशा मुक्त दोडामार्ग जनजागृती पदयात्रा

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ७ ः माणसाचे आयुष्य हे फार सुंदर आहे. आयुष्यातले रंग खुलविण्यासाठी प्रत्येकाने आपली बुद्धी शाबूत ठेवायला हवी. मुले श्रावणबाळ नाही तर कोणी पालक राम-सीता नाही. औषधातून बदल घडत नाहीत ते वर्तनातून घडतात. त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून वागले पाहिजे. दारू बंदी, सिगारेट बंदी यासारखी व्यसने सरकार बंद करू शकत नाही. त्यामुळे व्यसनापासून दूर राहायचे असेल तर, स्वभाव दोष ओळखून एकामेकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा, असे प्रतिपादन भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांनी केले.
येथील पंचायत समितीतर्फे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ‘नशा मुक्त दोडामार्ग’ जनजागृती पदयात्रा कार्यक्रम नुकताच झाला. त्यावेळी डॉ. देवधर बोलत होते.
व्यासपीठावर गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत, झरेबांबर सरपंच तथा सरपंच सेवासंघाचे तालुकाध्यक्ष अनिल शेटकर, नशाबंदी मंडळ सिंधुदुर्गच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर, आयनोडे सरगवे पुनर्वसनच्या सरपंचा श्रुती देसाई, हेवाळे सरपंच साक्षी देसाई आदी उपस्थित होते. विद्यार्थिनी स्पृहा सुमित दळवी, दक्षता बाबुराव घोगळे यांनी व्यसनमुक्ती संदर्भात भाषण केले. तर करण शेटकर यांची सेवन नावाची व्यसनमुक्तीपर मार्गदर्शनासाठी चित्रफित दाखविली. आपल्या घरात कोणी जर व्यसन करत असेल तर त्याला आधी व्यसन मुक्त कसे करता येईल, याकडे घरातील प्रत्येकाने लक्ष द्यावे. तसेच आपल्या घरात कोणीही कोणताही व्यसन करू नये आणि निरोगी आयुष्य जगावे यासाठी सतर्क राहावे, असे मार्गदर्शन अर्पिता मुंबरकर यांनी केले. निवृत्त कनिष्ठ प्रशासन अधिकारी जगदीश सावंत यांनी प्रास्ताविक केले. सुमित दळवी यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com