‘वंदे मातरम्’मुळे राष्ट्रीय ऐक्य अबाधित

‘वंदे मातरम्’मुळे राष्ट्रीय ऐक्य अबाधित

Published on

03165

‘वंदे मातरम्’मुळे राष्ट्रीय ऐक्य अबाधित

भूषण साटम ः मालवणात ‘सार्धशताब्दी महोत्सव’ उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ८ : स्वातंत्र्य लढ्यादरम्यान बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेले ‘वंदे मातरम्’ हे गीत भारतीयांचे प्रेरणागीत बनले. ‘वंदे मातरम्’ म्हणत अनेकांनी देशासाठी बलिदान दिले. आज दीडशे वर्षांनंतरही ते देशासाठी महत्त्वाचे असून ते कायम अबाधित राहील. वंदे मातरम् म्हणजे आपले राष्ट्रीय कर्तव्य आणि ऐक्य असून भारताचे ते धडधडणारे हृदय आहे, असे प्रतिपादन शिवराज मंचचे अध्यक्ष भूषण साटम यांनी येथे केले.

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करणारे ‘वंदे मातरम्’ या गीताला यंदा १५० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभाग व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या विद्यमाने ‘वंदे मातरम् सार्धशताब्दी महोत्सव’ साजरा होत आहे. या अंतर्गत तहसीलदार वर्षा झालटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मालवण (आयटीआय) यांच्या आयोजनाखाली मालवणात ‘वंदे मातरम् सामूहिक गायन’ कार्यक्रम मामा वरेरकर नाट्यगृह येथे शुक्रवारी (ता. ७) झाला.
व्यासपीठावर नायब तहसीलदार नीलिमा प्रभुदेसाई, पोलिस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत, कार्यक्रम समितीचे सदस्य आयटीआय मालवणचे प्राचार्य अमित खेडेकर, भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. पवन बांदेकर, शासकीय तंत्रनिकेतन मालवणचे प्राचार्य डॉ. दिलीप घायतिडक, कौशल्य विकास प्रतिनिधी सिद्धेश घाडीगावकर, प्रा. मंगेश चव्हाण, साहित्यिका मेघना जोशी, मातृत्व आधार फाउंडेशनचे दादा वेंगुर्लेकर, दुर्गवीर प्रतिष्ठानचे जगदीश गवस, पत्रकार भूषण मेतर, उद्योजक हेमंत शिरगावकर, स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य कैलास राबते, कबड्डी प्रशिक्षक हरिश्चंद्र साळुंखे, महिला बचतगट प्रमुख मंदाकिनी लोके आदी उपस्थित होते.
प्रा. अमित खेडेकर यांनी प्रास्ताविक केले. विविध स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविले. लघुनाटिका सादर करण्यात आली.
तहसीलदार झालटे यांनी, स्वातंत्र्यलढ्यात वंदे मातरम् गीताने देशवासीयांना स्फूरण चढले. ‘वंदे मातरम्’ या दोन शब्दांची इंग्रजांनी धास्ती घेतली होती. या गीताचे महत्त्व हजारो वर्षे अबाधित राहील, असे सांगितले. श्रीधर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन केले. ‘भारत माता की जय’चा जयघोष करण्यात आला. भाऊ सामंत, विजय केनवडेकर, श्रीधर काळे, पूजा सरकारे, राजेश फोंडेकर, कविता लहारे, गौरव तांडेल, ज्ञानदेव मायबा, संदीप सावंत, सुभाष कांबळी, भरत देऊलकर, संतोष गोवेकर, निक्सन फर्नांडिस, दिलीप गावकर, दशरथ सावंत, दिलीप मच्छिंद्र आदी उपस्थित होते. प्रभुदास आजगावकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. मंगेश चव्हाण यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com