चिपळूणमध्य क्रिकेट स्पर्धा

चिपळूणमध्य क्रिकेट स्पर्धा

Published on

चिपळूणमध्ये
क्रिकेट स्पर्धा
चिपळूण : चिपळूण क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित तालुकास्तरीय १६ वर्षांखालील लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा १० ते १६ नोव्हेंबरदरम्यान रंगणार आहे. स्पर्धेला अधिक चांगला प्रतिसाद मिळाल्याने एकूण १४ शाळांनी सहभाग नोंदवला आहे. स्पर्धा बादपद्धतीत आयोजित करण्यात आली असून, प्रत्येक सामना २० षट्कांचा असणार आहे. ही स्पर्धा चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दशरथशेठ दाभोळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. स्पर्धेचे उद्‍घाटन १० रोजी सकाळी ९ वा. चिपळूण–संगमेश्वर मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.

पृथ्वीचा पाच दिवस
सायकल प्रवास
चिपळूण ः तालुक्यातील सावर्डे येथील डॉ. कृष्णकांत पाटील यांचा मुलगा पृथ्वी पाटील यांनी केवळ ५ दिवसांत सलग १५०० किलोमीटरचा बीआरएम सायकलिंग प्रवास पूर्ण केली. या प्रवासात त्यांनी कराड–सातारा–पंढरपूर–सोलापूर–बारामती असा मार्ग पार करत पुन्हा त्याच मार्गे कराड येथे परतीचा प्रवास पूर्ण केला. हा प्रवास केवळ शारीरिक तग धरण्याचा नव्हे तर मानसिक शक्ती, अपार सहनशीलता आणि अटळ जिद्दीचा उत्तम नमुना ठरला आहे. पृथ्वीने दाखवून दिलं, अंतर कितीही लांब असो, जिद्द आणि आवड असेल तर प्रत्येक पेडल इतिहास घडवते, हे त्यांनी दाखवून दिले. कोकणातील रायडर्ससाठी हा एक प्रेरणादायी क्षण ठरला असून, त्यांच्या या उल्लेखनीय पराक्रमाने सायकलिंग क्षेत्रात नवा जोश निर्माण केला आहे. या यशाबद्दल आमदार शेखर निकम, माजी सभापती पूजा निकम यांनी पृथ्वी पाटील यांचे अभिनंदन केले.

कबड्डी संघाच्या
कर्णधारपदी गेल्ये
संगमेश्वर ः ३६वी किशोर-किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेकरिता रत्नागिरी जिल्हा किशोर-किशोरी संघ निवडण्यात आला आहे. कबड्डी किशोर गट संघाच्या कर्णधारपदी संगमेश्वर तालुक्याचा दादासाहेब सरफरे विद्यालय शिवने-बुरंबीचा विद्यार्थी अथर्व गेल्ये याची निवड झाली आहे. जिल्हासंघाची निवड नुकतीच करण्यात आली आहे. आता हा संघ राज्य अजिंक्यपद चाचणीसाठी सज्ज झाला आहे. सरफरे विद्यालयाच्या अथर्वची निवड झाल्यामुळे बुरंबी पंचक्रोशी शिक्षणसंस्थेचे पदाधिकारी, संचालक तसेच कबड्डी तालुका असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन होत आहे. जिल्हासंघामध्ये सूरज राठोड, सार्थक मोहिते, नैतिक कळंबटे, विघ्नेश आरेकर, हार्दिक गुरव, सार्थक कदम, माधव चिले, सम्राट गमरे, कार्तिक बाक्कर, विराज बडद, वृषभ माईन, पियुष कांबळी, प्रथमेश रामाणे यांची निवड झाली असून, प्रशिक्षक म्हणून प्रदीप शिंदे आणि विक्रम शिंदे यांची निवड झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com