पर्यावरण संवर्धनासाठी आता युवकांनी पुढे यावे...
rat9p9.jpg-
03321
डॉ. प्रशांत परांजपे
इंट्रो
पर्यावरण संवर्धनाकरता आता युवकांचा सहभाग फार महत्त्वाचा होणार आहे. याकरिता महाविद्यालयांनी पर्यावरण विषय केवळ अभ्यासापुरता मर्यादित न ठेवता शाश्वत पर्यावरण विकासाच्या दृष्टीने धोरणात्मक कार्यक्रमाची आखणी करून प्रत्येक युवकाला पाच कुटुंबे दत्तक देऊन त्यांची जीवनशैली पर्यावरणपूरक बनवण्याकरिता मार्गदर्शन करणे, प्रोत्साहित करणे आणि त्याकरिता अंतिम परीक्षेत विशेष गुणांकन देणे आवश्यक आहे.
– डॉ. प्रशांत परांजपे, दापोली
------------
पर्यावरण संवर्धनासाठी आता युवकांनी पुढे यावे...
विकासाच्या नावाखाली गेल्या काही वर्षांत निसर्गाला भकास करण्याचा विडा अनेक विविध विचारसरणींनी उचलला आहे. निसर्गाचा ऱ्हास हा संपूर्ण जगामध्ये होत असतानाच आता फक्त आणि फक्त युवा पिढीच याच्या संवर्धनासाठी निसर्गाची ढाल बनून उभे राहू शकते. येणारा काळ हा कठीण काळ आहे. गेल्या फक्त वीस वर्षांचा विचार केला तर अनेक विविध संशोधने आणि विकासाच्या अतिप्रचंड महत्त्वाकांक्षेमुळे निसर्गाच्या संवर्धनाचा कोणताही विचार न करता आम्ही फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करत जगत राहिलो. या अहंपणामुळे, "मी"पणामुळेच आज जगभर निसर्गाने धडकी भरवणारा संहार सुरू केला आहे.
यूज अँड थ्रोच्या अतिवापरामुळे आज हवा, पाणी आणि जमीन या तिन्ही ठिकाणी प्लास्टिकने आपले वर्चस्व दाखवायला सुरुवात केली आहे आणि त्यामुळे सजीव सृष्टीच्या जगण्यावर त्याचा विपरीत परिणाम जाणवू लागला आहे.
हवेमध्ये प्लास्टिकचे सूक्ष्म कण (मायक्रोप्लास्टिक) आढळतात, जे विविध स्रोतांमधून येतात, जसे की सिंथेटिक कपड्यांतील तंतू, वाहनांचे टायर, सौंदर्यप्रसाधने आणि मोठ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे विघटन. हे कण वाऱ्यामुळे दूरवर पसरतात आणि हवा, जमीन तसेच जलस्रोतांना प्रदूषित करतात. या कणांचा मानवी आरोग्यावरही परिणाम होतो, ज्यात फुफ्फुसांच्या समस्या आणि कर्करोगाचा धोका यांचा समावेश आहे.
* हवेतील मायक्रोप्लास्टिक्सचे स्रोत
- सिंथेटिक कपडे : कपडे धुताना त्यांच्यातून निघणारे सूक्ष्म तंतू हवेत मिसळतात.
- वाहनांचे टायर : रस्त्यावरील टायर घासल्याने बारीक प्लास्टिकचे कण हवेत सोडले जातात.
- मोठ्या प्लास्टिकचे विघटन : सूर्यप्रकाश आणि हवामानामुळे मोठ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे विघटन होऊन लहान कण तयार होतात.
- सौंदर्यप्रसाधने आणि इतर उत्पादने : काही सौंदर्यप्रसाधने आणि इतर उत्पादनांमध्ये प्लास्टिकचे छोटे कण वापरले जातात.
* हवेतील मायक्रोप्लास्टिक्सचा प्रसार
- वाऱ्याचा प्रवाह : वाऱ्यामुळे हे कण जगभर दूरवर पसरतात, अगदी दुर्गम भागांपर्यंत.
- समुद्र आणि धुके : समुद्राच्या पृष्ठभागावरून उडणारे कण (sea spray) आणि धुक्याद्वारेही हे कण हवेत मिसळतात आणि हजारो किलोमीटरचा प्रवास करू शकतात.
* मानवी आरोग्यावरील परिणाम
- श्वसनासंबंधी समस्या : फुफ्फुसांमध्ये हे कण जमा झाल्यामुळे जळजळ होऊ शकते आणि श्वसनाची क्षमता कमी होऊ शकते.
- कर्करोग : काही अभ्यासांनुसार, हवेतील मायक्रोप्लास्टिक्स फुफ्फुस आणि कोलन कर्करोगासारख्या गंभीर आजारांशी संबंधित असू शकतात.
- इतर आजार : काही संशोधनांमधून असे दिसून आले आहे की हे कण शरीरात प्रवेश करून जळजळ निर्माण करू शकतात.
युवकांनी पर्यावरण संवर्धनात पुढे येणे गरजेचे आहे, कारण तरुणांमधील ऊर्जा, सर्जनशीलता आणि तंत्रज्ञानाची जाण यांमुळे ते पर्यावरण संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात. यामध्ये वृक्षारोपण करणे, कचरा कमी करणे, प्लास्टिकचा वापर टाळणे, सिंगल-यूज वस्तूंचा वापर बंद करणे, पाणी वाचवणे आणि स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन देणे यांसारख्या कृतींचा समावेश होतो.
यासोबतच, युवकांनी शिक्षण आणि जागरूकता वाढवण्यासाठी, समुदाय-आधारित प्रकल्पांमध्ये भाग घेण्यासाठी आणि पर्यावरणीय धोरणांवर प्रभाव टाकण्यासाठी देखील महत्त्वाची भूमिका बजावणे आवश्यक आहे.
* युवकांचे पर्यावरण संरक्षणातील योगदानाची अपेक्षा
- जागरूकता आणि शिक्षण : युवक सोशल मीडिया आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करून पर्यावरणाच्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करू शकतात आणि लोकांना शिक्षित करू शकतात.
- समुदाय-आधारित प्रकल्प : वृक्षारोपण मोहीम, कचरा कमी करणे आणि स्वच्छ ऊर्जा प्रकल्पांसारख्या स्थानिक उपक्रमांमध्ये युवक सक्रियपणे सहभागी होऊ शकतात.
- तंत्रज्ञानाचा वापर : युवकांमध्ये तंत्रज्ञानाची जाण असल्याने ते पर्यावरण संरक्षणासाठी नवीन आणि नाविन्यपूर्ण उपाय शोधू शकतात.
- धोरणात्मक सहभाग : युवक राजकीय प्रक्रिया आणि निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊन पर्यावरण संरक्षणासाठी आवाज उठवू शकतात.
* पर्यावरण संरक्षणासाठी युवकांनी करावयाच्या कृती
- वृक्षारोपण : हवामान बदलाचा सामना करण्यासाठी आणि हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी अधिकाधिक झाडे लावणे महत्त्वाचे आहे.
- कचरा व्यवस्थापन : कचरा कमी करणे, पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरण करणे यांसारख्या चांगल्या सवयी लावून कचऱ्याचे प्रमाण कमी करता येते.
- पाणी बचत : पाण्याची बचत करणे आणि पाण्याचे स्रोत जतन करणे हे पर्यावरण संरक्षणाचा एक महत्त्वाचा भाग आहे.
- प्लास्टिकचा वापर टाळणे : प्लास्टिकच्या पिशव्या आणि इतर एकदाच वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचा वापर कमी करणे महत्त्वाचे आहे.
- ऊर्जेचा वापर कमी करणे : ऊर्जेचा अपव्यय टाळणे आणि स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.
प्रत्येक युवकाने पाच घरे दत्तक घेऊन या पाच घरांना "पर्यावरणपूरक निवास" अशी पाटी लावण्यासाठी यशस्वी प्रयत्न करणे अर्थात त्यांच्या जीवनशैलीला पूर्णतः पर्यावरणपूरक करण्यासाठी संपूर्ण सहकार्य करणे आणि समाजामध्ये आपल्या समवेत या पाच कुटुंबांचा आदर्श निर्माण करणे अशा उपाययोजना करता येऊ शकतात.
महाविद्यालयांचा पुढाकार आवश्यक
पर्यावरण संवर्धनामध्ये प्रत्येक महाविद्यालयाने फक्त परीक्षेपुरता पर्यावरण विषय न ठेवता तो काळाची गरज म्हणून अंगीकारणे अत्यावश्यक आहे. याकरिता वरीलप्रमाणे महाविद्यालयातील प्रत्येक युवकाला पाच घरे (कुटुंबे) दत्तक देऊन ती पाच घरे, ती पाच कुटुंबे पूर्णतः पर्यावरणपूरक जीवनशैलीने परिपूर्ण केल्यानंतर त्या विद्यार्थ्याला अंतिम परीक्षेमध्ये विशेष गुणांकन देण्याची योजना आखणे अत्यावश्यक गोष्ट आहे.
------
(लेखक पर्यावरणाचा शाश्वत विकास या विषयातील डॉक्टरेट पदवीधर आहेत)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

