महामार्गाची ‘मलमपट्टी’; प्रवाशांना दिलासा

महामार्गाची ‘मलमपट्टी’; प्रवाशांना दिलासा

Published on

03352


महामार्गाची ‘मलमपट्टी’; प्रवाशांना दिलासा

कुडाळमध्ये समाधान, हुमरमळा, पणदूर, वेताळबांबर्डेत युद्धपातळीवर काम

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ९ ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या कुडाळवासीयांना लवकरच दिलासा मिळणार आहे. वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या आणि अपघातांना निमंत्रण देणाऱ्या हुमरमळा, पणदूर व वेताळ बांबर्डे येथील महामार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला अखेर गती मिळाली आहे. महामार्ग ठेकेदाराने युद्धपातळीवर हे काम सुरू केले आहे.
मागील अनेक वेळा ठेकेदार जागेवर उपस्थित नसल्याने कामे निकृष्ट होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या; मात्र यावेळी परिस्थिती वेगळी दिसत आहे. संबंधित ठेकेदार स्वतः कामाच्या ठिकाणी उपस्थित राहून काम योग्य प्रकारे पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले आहे. ठेकेदाराने दिलेल्या माहितीनुसार, खड्डे बुजवण्यासाठी रस्त्याच्या स्वरुपानुसार योग्य साधनसामग्रीचा वापर केला जात आहे.
---
समस्येची घेतली दखल
डांबरीकरण असलेल्या ठिकाणी डांबरी मटेरियल वापरले जाणार आहे, तर काँक्रिट असलेल्या रस्त्यांवर काँक्रिट मटेरियलचा वापर केला जाणार आहे. दीर्घ काळापासून खड्ड्यांच्या समस्येने महामार्गावर प्रवास करणे धोकादायक बनले होते. अपघातांसह वाहनांचे नुकसान आणि वेळेचा अपव्यय या समस्यांमुळे प्रवासी त्रस्त होते.
---
गुणवत्तापूर्ण कामाची मागणी
या दुरुस्तीच्या कामामुळे यापुढे तरी निदान कुडाळ महामार्गावरचे खड्डे बुजून लोकांचा प्रवास सुखकर होऊ शकेल, अशी आशा जनसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे. प्रवाशांनी व्यक्त केलेली ही आशा पूर्ण करून ठेकेदाराने गुणवत्तापूर्ण काम पूर्ण करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com