वेंगुर्लेत जानेवारीत ‘राज्य एकांकिका’

वेंगुर्लेत जानेवारीत
‘राज्य एकांकिका’
Published on

वेंगुर्लेत जानेवारीत
‘राज्य एकांकिका’
वेंगुर्ले ः ‘कलावलय’ वेंगुर्ले आयोजित व बी.के.सी. असोसिएशन, मुंबई पुरस्कृत सलग २९ व्या वर्षी (कै.) प्रा. शशिकांत यरनाळकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा २ ते ४ जानेवारी या कालावधीत वेंगुर्ले कॅम्प येथील नाटककार मधुसुदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात दररोज सायंकाळी ४.३० वाजता होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघांना देण्यात येणाऱ्या पारितोषिकांच्या रक्कमेत गेल्या वर्षीपासून वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे प्रथम क्रमांकास १५ हजार, द्वितीय क्रमांकास १० हजार, तृतीय ७ हजार, उत्तेजनार्थ दोन संघांना प्रत्येकी ३ हजार व कायम स्मृतिचिन्हे तसेच वैयक्तिक स्त्री-पुरुष अभिनय, दिग्दर्शन, तांत्रिक अंगे यांतील प्रथम तीन क्रमांकांना प्रत्येकी १०००, ७००, ५०० व स्मृतिचिन्हे देण्यात येतील. या स्पर्धेसाठी प्रथम प्राधान्याने नावनोंदणी करणाऱ्या १५ संघांनाच प्रवेश दिला जाईल. नाव नोंदणीसाठी संघांनी ‘कलावलय’ अध्यक्ष सुरेंद्र उर्फ बाळू खामकर किंवा शशांक मराठे यांच्याशी संपर्क साधावा. या स्पर्धेचे यंदाचे २९ वे वर्ष असून स्पर्धक संघांनी आपला प्रतिसाद नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
...................
आदर्श आचारसंहिता
पालिका हद्दीपर्यंतच
सावंतवाडी ः नगरपालिकेची निवडणूक असल्याने शहरात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे; मात्र पालिका हद्दीपर्यंतच आचारसंहिता आहे. माजगाव, कोलगाव, चराठा या भागात आचारसंहिता लागू नाही, असे निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी स्पष्ट केले. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया १० ते १७ नोव्हेंबर या कालावधीत आहे. त्यात एक दिवस सुटीचा आल्याने अवघे सात दिवसच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मिळत आहेत. उमेदवारी अर्ज १७ नोव्हेंबरला भरल्यानंतर अर्ज मागे घेण्याची तारीख २१ नोव्हेंबरपर्यंत आहे. प्रचारासाठी अवघे दहा दिवसच मिळणार आहेत.
---
हडी कालिकादेवी
जत्रोत्सव उत्साहात
मालवण ः हडी येथील श्री कालिकादेवी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा जत्रोत्सव उत्साहात, बहुसंख्य भाविकांच्या उपस्थितीत साजरा झाला. यावेळी मंदिर परिसरात दिव्यांची आरास व रांगोळीच्या माध्यमातून साकारलेली श्रीरामाची प्रतिमा लक्षवेधी ठरली. मंदिरात विविध कार्यक्रम झाले. दिव्यांची आरास व रांगोळीच्या माध्यमातून साकारलेली श्रीरामाची प्रतिमा सर्वांचे आकर्षण ठरली.
...................
सावंतवाडी आगारास
एक लाखाचा नफा
सावंतवाडी ः सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीच्या वार्षिक जत्रोत्सवाला जाणार्‍या भाविकांसाठी सोडण्यात आलेल्या जादा गाड्यांना चांगला प्रतिसाद लाभला. त्यामुळे सावंतवाडी आगाराला सुमारे १ लाख २० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. गतवर्षीपेक्षा यावर्षी दहा हजार रुपयांचे उत्पन्न अधिक मिळाले. जत्रोत्सवासाठी सावंतवाडी आगाराकडून १२८ जादा फेऱ्या सोडण्यात आल्या. त्यातून आगाराला १ लाख १९ हजार ६४ रुपये उत्पन्न मिळाले. यासाठी आगार व्यवस्थापक नीलेश गावित यांच्यासह वाहक, चालक, वाहतूक नियंत्रक, यांत्रिकी विभाग कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
.......................
देवबाग ग्रामपंचायतीतर्फे
गुरे पकड मोहीम हाती
मालवण ः देवबाग ग्रामपंचायतीच्या वतीने मोकाट फिरणार्‍या ९ गुरांना पकडण्यात आलेले आहे. ही मोहीम नियमितपणे सुरू राहणार असल्याचे सरपंच उल्हास तांडेल यांनी स्पष्ट केले आहे. मोकाट गुरांच्या मालकांनी २४ तासांच्या आत दंड व खर्च जमा करून गुरे ताब्यात घ्यावीत; अन्यथा ही गुरे गोशाळेत जमा करण्यात येतील. मागाहून कोणत्याही प्रकारची तक्रार स्वीकारली जाणार नाही, असेही तांडेल यांनी स्पष्ट केले आहे. देवबाग गावात सातत्याने मोकाट गुरांचा प्रश्न निर्माण झाल्याने ग्रामपंचायतीकडून ही मोहीम हाती घेण्यात आली होती. यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
.......................
फ्रान्सिस शिवलकरचे
अभिनय स्पर्धेत यश
मालवण ः रामकृष्ण हरिश्चंद्र देसाई आयोजित राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेत तालुक्यातील नारायण अनंत देसाई टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालयाचा फ्रान्सिस शिवलकर या विद्यार्थ्याचा राज्यात प्रथम क्रमांक आला. तसेच एकांकिका स्पर्धेत त्याला सर्वोत्कृष्ट विनोदी भूमिकेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचे जिल्हाभरातून अभिनंदन होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com