सिंधुदुर्गला अग्रेसर ठेवण्यासाठी प्रयत्नशील

सिंधुदुर्गला अग्रेसर ठेवण्यासाठी प्रयत्नशील

Published on

03420
सिंधुदुर्गनगरी ः येथे पालकमंत्री नीतेश राणे यांचा संविधानिक हितकारिणी महासंघ सिंधुदुर्गतर्फे सत्कार करण्यात आला.


सिंधुदुर्गला अग्रेसर ठेवण्यासाठी प्रयत्नशील

पालकमंत्री नीतेश राणे ः जातिवाचक नावे बदलणारा पहिला जिल्हा

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ९ ः जिल्ह्यातील १९२ वस्त्या व २५ रस्त्यांची जातिवाचक नावे बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. असा निर्णय घेणारा राज्यातील सिंधुदुर्ग हा पहिला जिल्हा आहे. याचा अभिमान आहे. सिंधुदुर्ग जिल्हा विकासाच्या दृष्टीने कायम पहिल्या क्रमांकावर ठेवण्याचे प्रयत्न आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री नीतेश राणे यांनी केले.

अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील वाडी-वस्त्यांना व रस्त्यांना असलेली जातीवाचक नावे बदलण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पालकमंत्री राणे यांचा संविधानिक हितकारिणी महासंघ सिंधुदुर्गतर्फे सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. येथील (कै.) बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवन येथे हा कार्यक्रम झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाला प्रारंभ झाला.
भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, संविधानिक हितकारणी महासंघ सिंधुदुर्गचे अध्यक्ष महेश परुळेकर, जिल्हा संघटक अंकुश जाधव, संघटनेचे सचिव रमाकांत जाधव, गौतम खुडकर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर आदी उपस्थित होते. यावेळी श्री. राणेंसह आवश्यक सहकार्य करणाऱ्या सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांचा सत्कार करण्यात आला. श्री. राणेंच्या हस्ते सरपंच, नगरसेवकांचा सत्कार झाला.

रमाकांत जाधव म्हणाले, ‘‘संविधानिक हितकारिणी’ची स्थापना तीन वर्षांपूर्वी झाली असून समाजाच्या हितासाठी कार्यरत आहे आणि यापुढेही राहील.’ श्री. परुळेकर यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. श्री. राणे यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाने रस्ते व वस्त्यांना असलेली जातिवाचक नावे बदलण्याचा निर्णय झाला. त्यामुळे त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला आहे. आमच्या समाजाचे अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत. पैकी एक असलेला जातीवाचक नावे बदलण्याचा निर्णय झाला आहे. आता १९९० मध्ये धर्मांतरीत झालेल्या नव बौद्ध बांधवांना अनुसूचित जातीचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले.

श्री. राणे म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील जातीवाचक नावे असलेल्या १९२ वस्त्या व २५ रस्त्यांची नावे बदलण्याच्या निर्णयात योगदान देता आले याचा आनंद आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे व सार्वजनिक बांधकाम अभियंता अजयकुमार सर्वगोड यांचेही योगदान महत्त्वाचे आहे. आजचा हा कार्यक्रम सिंधुदुर्गच्या इतिहासात नोंद करण्यासारखा आहे. जातीवाचक नावे बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारा सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला जिल्हा आहे आणि तो माझा आहे याचा अभिमान आहे. सिंधुदुर्ग जिल्हा विकासाच्या दृष्टीने कायम पहिल्या क्रमांकावर राहावा यासाठी प्रयत्न आहेत.’
---
सर्वांशी संवाद, कुणीही शत्रू नाही!
पालकमंत्री म्हणाले, ‘माझा येथे कोणीही शत्रू नाही. जिल्ह्याच्या हितासाठी सर्वांशी संवाद साधतो. जिल्ह्याचा विकास करायचा आहे. जिल्ह्यातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोचला पाहिजे हे प्रयत्न राहतील. सर्व कुटुंबाला आकार देण्याचे काम राज्याच्या माध्यमातून केले जाईल. दरम्यान, हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार राज्यभर राबविण्याची तयारी करीत आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com