साहित्य महर्षी केळुसकर ''समाजभूषण''
swt101.jpg
03495
कुडाळ ः नाईक-मराठा समाजाच्या वतीने (कै.) प्रमोद वालावलकर यांना (मरणोत्तर) आबा आचरेकर स्मृती समाज गौरव पुरस्कार प्रदान कवी अजय कांडर, सुनील सांगेलकर, किरण नाईक, राजन नाईक आदी. प्रज्ञा वालावलकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. (छायाचित्र ः अजय सावंत)
साहित्य महर्षी केळुसकर हे ‘समाजभूषण’
अजय कांडर ः कुडाळमध्ये नाईक-मराठा मंडळातर्फे स्मृतिदिन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १० ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरू गुरुवर्य केळुसकर हे समाजाला भूषण आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि गौतम बुद्ध यांचे चरित्र त्यांनी लिहिले. त्यांची माहिती समाजातीलच नव्हे तर प्रत्येक मराठी माणसाला असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कवी अजय कांडर यांनी केले. केळुसकर गुरुजी आणि आपले नाते हे बौद्धिक नाते आहे. बौद्धिक नाते हे सर्वश्रेष्ठ असते, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि केळुसकर गुरुजींनी दाखवून दिले आहे, असेही श्री. कांडर यांनी सांगितले.
नाईक मराठा मंडळ मुंबई यांच्या वतीने साहित्य महर्षी गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळूसकर स्मृतिदिन आणि शताब्दी महोत्सव येथील महालक्ष्मी सभागृहात आयोजित करण्यात आला. (कै.) मधुकर नारायण उर्फ बाबा आचरेकर स्मृती समाज गौरव प्रदान आरोग्य क्षेत्रातील जनसामान्यांचे देवदूत (कै.) डॉ. प्रमोद वालावलकर यांना (मरणोत्तर) पुरस्कार जाहीर केला होता. त्या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या पत्नी प्रज्ञा वालावलकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कवी अजय कांडर यांच्यासह विशेष अतिथी सिंधुदुर्ग देवळी समाज मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजन नाईक, नाईक मराठा मंडळ मुंबईचे कार्याध्यक्ष सुनील सांगेलकर, चिटणीस किरण नाईक, विजय शेट्टी, खजिनदार विजय अणावकर, सदस्य मनोहर नाईक, विनायक शिंदे, घनश्याम वालावलकर, अदिती नादोसकर, विजय अणावकर, राजश्री कबरे, देवळी समाजाचे भास्कर केरवडेकर, अनघा तेंडोलकर, मयूर आरोलकर, प्रदीप कुडाळकर, संदीप देवळी, अर्चना घावनाळकर आदी उपस्थित होते
प्रज्ञा वालावलकर यांनी, डॉ. वालावलकर यांना कार्याच्या गौरवाची कोणतीही अभिलाषा नव्हती. ते या विरोधात होते. त्यांनी आपल्या वैद्यकीय क्षेत्रात केलेली गरीब रुग्णांची सेवा, हाच त्यांचा सन्मान होता, असे गौरवोद्गार काढले. माझा झालेला सत्कार हा सर्व देवळी समाजाचा सत्कार आहे. कुडाळचे महिला रुग्णालय सुरू होण्यामागे डॉ. वालावलकर यांचे योगदान आहे, असे राजन नाईक यांनी सांगितले. सांगेलकर यांनी, शिवचरित्रकार गुरुवर्य केळुसकर यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मोठे करण्यात फार मोठा वाटा आहे. त्यांचे कार्य स्मरणात राहण्यासाठी केंद्राकडे गुरुवर्य केळूसकरांचे पोस्टर तिकीट (पोस्टाचे तिकीट) तयार करण्याची मागणी केली आहे. लवकरात लवकर ही मागणी पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला. केळूसकरांचे मूळ गाव असलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील केळूस येथे त्यांचे स्मारक बांधण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.
मान्यवरांचा परिचय किरण नाईक यांनी करून दिला. गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्यासह रेडी येथील चित्रा कनयाळकर, सिने कला दिग्दर्शक महेश कुडाळकर (कुडाळ) यांचा ज्ञातीबांधव म्हणून विशेष सत्कार करण्यात आला. सूत्रसंचलन अदिती नादोसकर यांनी केले. आभार राजश्री कबरे यांनी मानले.
चौकट
गुरुवर्य केळुसकरांची वेशभूषा लक्षवेधी
सुनील सांगेलकर यांनी घातलेल्या दणकेबाज गाऱ्हाण्याने कार्यक्रमाला सुरुवात झाली. ज्ञातीतील लहानथोर मंडळींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यामध्ये ‘बयो’ फेम रुची नेरुरकर हिची कथ्थक गणेशवंदना, ‘वंडरबॉय’ विजय तुळसकर याची हार्मोनियमवरील रागदारी, राधा-कृष्ण नृत्य, विठूचा गजर नृत्य, गवळण अशा कार्यक्रमांचा समावेश होता. गुरुवर्य केळुसकर यांनी शंभर वर्षांपूर्वी नाईक मराठा मंडळाची स्थापना केली. त्यांची व्यक्तिरेखा किशोर नांदोस्कर यांनी साकारत तरुणांनी ज्ञातीसाठी पुढे यावे, असे आवाहन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

