-निलांश चिपळूणकर उपांत्य फेरीत दाखल

-निलांश चिपळूणकर उपांत्य फेरीत दाखल

Published on

- rat१०p५.jpg-
P२५O०३५१५
गुहागर - नीलांशी चिपळूणकर विरुद्ध संदीप देवरूखकर सामन्यातील एक क्षण.
----
नीलांशी चिपळूणकर उपांत्यफेरीत दाखल
राज्य कॅरम स्पर्धा; रत्नागिरीच्या आकांक्षाची भरारी
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. १० ः राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरी गटात उपउपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईच्या नीलांशी चिपळूणकरने मुंबईच्या माजी राष्ट्रीय विजेत्या संदीप देवरूखकरला २५-१२, १६-२ असे सलग दोन सेटमध्ये पराभूत केले तर महिला एकेरीच्या उपउपांत्य फेरीत ठाण्याच्या समृद्धी घाडिगावकरने मुंबईच्या उर्मिला शेंडगेवर चुरशीचा विजय मिळवला. तिने उपांत्यफेरी गाठताना उर्मिलाचा २५-१२, १०-२० व २५-१२ असा पराभव केला.
येथील प्रदीप परचुरे व कॅरम लव्हर्स ग्रुप यांच्यावतीने भंडारी हॉलमध्ये राज्य कॅरम स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेला राज्यभरातील नामांकित खेळाडून सहभागी झाले आहेत. त्यामुळे सामनेही चुरशीचे होत आहेत. उपउपांत्य फेरीत महिला एकेरीमध्ये रत्नागिरीच्या आकांक्षा कदमने मुंबईच्या ममता कुमारीवर २५-१३, २५-९ अशी मात केली तर सोनाली कुमारीने (मुंबई) प्राजक्ता नारायणकरचा (मुंबई उपनगर) २५-८, २४-६ असा सलग सेटमध्ये, रिंकी कुमारीने (मुंबई) चैताली सुवारेचा (ठाणे) १८-१, २५-१२ असा पराभव केला. पुरुष एकेरीतील उपउपांत्य फेरीत सागर वाघमारेने (पुणे) अभिषेक चव्हाणचा (रत्नागिरी) १९-१, २३-१३ असा तर विकास धारियाने ( मुंबई) संजय मांडेचा (मुंबई) २५-१२, २५-१४, पंकज पवारने (ठाणे) राजेश गोहिलचा (रायगड) १८-५, २३-१८ असा सलग सेटमध्ये पराभव केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com