''दीपसुंदरी'' स्पर्धेमध्ये स्नेहा कुडतरकर प्रथम
०३५६८
‘दीपसुंदरी’ स्पर्धेमध्ये
स्नेहा कुडतरकर प्रथम
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १० ः येथील गौरी सावंत-बांदेकर यांनी खास विवाहित महिलांसाठी आयोजित केलेल्या ''दीपसुंदरी स्पर्धा २०२५'' या स्पर्धेत सावंतवाडी येथील स्नेहा कुडतरकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक स्मिता केंकरे (सावंतवाडी), तृतीय क्रमांक प्राची सावंत (दोडामार्ग) याव्यतिरिक्त सावंतवाडीच्या मिताली राऊळ यांना सर्वाधिक फॉलोवर्स आणि व्ह्यूज मिळवल्याबद्दल एकमेव विजेती स्पर्धक म्हणून विशेष पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत तब्बल ३७ विवाहित महिलांनी सहभाग घेतला होता. सहा जणींची उत्तेजनार्थ पारितोषिकांसाठी निवड करण्यात आली. रिना पाटील, प्रज्ञा अरोस्कर, विद्या आंब्रे, स्मिता नलावडे, प्रणाली रेडकर आणि उत्कर्षा परब, अशी त्यांची नावे आहेत. स्पर्धेचे परीक्षण नितीन बांदेकर आणि प्रणिता सावंत यांनी केले. आयोजक गौरी सावंत-बांदेकर यांनी सर्व विजेत्यांचे व सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

