फेक नरेटिव्ह ओळखून सडतोड उत्तरे शोधा
‘फेक नॅरेटिव्ह’ ओळखून उत्तरे शोधा
पारिजात पांडे; अधिवक्ता परिषदेने सुदृढ होणे गरजेचे
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : पूर्वीच्या युद्धामध्ये मायावी युद्धाद्वारे राक्षस युद्ध जिंकण्याचा प्रयत्न करत होते. आता राक्षसांचा प्रकार व युद्धपद्धती बदलली आहे, आता जाणीवपूर्वक फेक नॅरेटिव्ह समाजात पेरण्याचे काम चालू आहे. ते सजग होऊन ओळखून त्याला सडेतोड उत्तरे आपण शोधून मांडली पाहिजेत. यासाठी अधिवक्ता परिषदेने सर्वार्थाने अधिक सुदृढ होणे गरजेचे आहे. त्यासाठी आमचे पूर्ण सहकार्य असेल, असे प्रतिपादन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅंड गोवाचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य ज्येष्ठ अधिवक्ता पारिजात पांडे यांनी केले.
अधिवक्ता परिषद, कोकण प्रांत, रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा कार्यकारिणी व प्रत्येक तालुक्यातील तालुका कार्यकारिणीची घोषणा व स्वागत कार्यक्रमात ते बोलत होते. रत्नागिरी जिल्हा न्यायालयातील हॉलमध्ये कार्यक्रम झाला. गोवा येथील ज्येष्ठ अधिवक्ता प्रवीण फळदेसाई, प्रांत कार्यकारिणी उपाध्यक्ष (आऊटरिच आयाम) व रत्नागिरी जिल्हा पालक (समन्वयक) सदस्य अधिवक्ता अभिषेक गोगटे, प्रांत कार्यकारिणी उपाध्यक्षा अधिवक्ता प्रिया लोवलेकर व प्रांत कार्यकारिणी आऊटरिच मंत्री रेखाताई कांबळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह गजानन करमरकर यांच्यासमवेत रायगड जिल्हाध्यक्ष संतोष पवार व प्रांत संघटनमंत्री श्रीराम ठोसर उपस्थित होते. मावळते जिल्हाध्यक्ष भाऊ शेट्ये यांनी नवीन जिल्हाध्यक्ष एम. एम जैन यांना जिल्हाध्यक्षाची सुत्रे सोपवली.
--------
चौकट
आपली संस्कृती, मुल्ये यावीत
या वेळी प्रमुख अतिथी फळदेसाई यांनी अधिवक्ता परिषद ही वकिलांची सर्वात मोठी, राष्ट्रीय स्तरावर कार्यात असलेली संघटना असून ‘राष्ट्र सर्वोपरी’ या विचारधारेला मानणारी असल्याचे सांगितले. समाजातील शेवटच्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे, ही भावना एकत्रितपणे जपण्याचे काम संघटना करते. स्वभाषा ही न्यायालयाची भाषा असावी आणि वेगवेगळ्या निकालपत्रांमध्ये जसं लॅटिन, ग्रीक प्रोव्हर्ब दिसून येतं तसंच संस्कृत सुभाषिते व पंचतंत्रमधील मार्गदर्शक तत्त्वे यांचा संदर्भ येण्यासाठी वकिलांनी जाणीवपूर्वक अभ्यास करून त्याचा वापर कामात आणल्यास संस्कृती व मूल्येसुद्धा समोर येतील, असा मोलाचा मुद्दा त्यांनी मांडला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

