रत्नागिरी : अखेर रत्नागिरीत रस्त्याच्या कामाला सुरवात
rat10p13.jpg
03519
रत्नागिरी : शहरातील जेलरोड येथे रस्त्यावर डांबरग्रीटचा थर टाकण्याचे काम सुरू झाले.
--------------
रत्नागिरीत रस्त्याच्या कामाला सुरुवात
काँक्रिटीकरणापूर्वीच्या डांबरग्रीटचा थर टाकण्यास सुरवात ; दोन महिन्यात रस्ते पूर्ण होणार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : पावसामुळे रखडलेल्या शहरातील मुख्य रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाला कालपासून सुरवात झाली. अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणाचेही काम लवकरच होणार आहे. त्यासाठी सुमारे दहा कोटी रुपये मंजूर आहेत. साळवीस्टॉप ते मिरकरवाडापर्यंत मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण होत आले होते.
मारूती मंदिर ते आठवडा बाजारपर्यंतच्या एका मार्गिकेवरील काम शिल्लक आहे. काँक्रिट टाकण्यापूर्वी जो डांबरग्रीटचा थर अंथरला जातो तो टाकण्यात आला होता; परंतु मे महिन्यातच पावसाने हजेरी लावल्याने काँक्रिटीकरण करण्यापूर्वी टाकण्यात आलेला डांबरग्रीटचा थर वाहून गेला. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस पडत राहिल्याने शहरातील रस्त्यांवरच्या खड्ड्यांमध्येही भर पडली. पाऊस लांबल्याने यापूर्वीच मंजूर असलेले रस्ते करण्यात ठेकेदार कंपनीला अडथळा येत होते.
पाऊस नोव्हेंबरपर्यंत पडला आणि या दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यामुळे रखडलेले काँक्रिटीकरण व खड्ड्यांच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी जोर देत आंदोलने केली; परंतु पावसामुळे खड्डे भरण्यात अडथळा येत होता. जरी भरले तरी पाऊस सतत पडत असल्याने पुन्हा खड्डे पडत होते.

