बहादूरशेख नाक्यात धुळीचे साम्राज्य
-rat१०p२२.jpg-
P२५O०३५६१
चिपळूण ः बहादूरशेख नाका येथे वाहनचालकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.
----
बहादूरशेख नाक्यात धुळीचे साम्राज्य
उड्डाणपुलाचे काम ; अपघाताचे वाढले धोके
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ११ ः शहरातील बहादूरशेख नाका येथील पुलाजवळच्या रस्त्यावर धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ज्या ठिकाणी उड्डाणपूल सुरू होणार आहे त्याच ठिकाणी धुळीचा त्रास जाणवत आहे. या रस्त्यावर वाहनांची रहदारी अधिक आहे. त्यामुळे नागरिकांसह वाहनचालकांना धुळीच्या समस्येला सामोरे जावे लागते. वाहनांच्या उडणाऱ्या धुळीमुळे या मार्गावर अपघाताची शक्यता वाढली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर बहादूरशेख नाका येथे वाशिष्ठी नदीवर नवीन पूल बांधण्यात आला आहे. चिपळूण शहराच्या बाजूने असलेल्या जोडरस्त्यावर काही वर्षापूर्वी डांबर टाकण्यात आले होते. ते डांबर वाहून गेले नंतर सिमेंट काँक्रीटने रस्ता तयार करण्यात आला. त्याचाही दर्जा निकृष्ट असल्यामुळे येथे वाहन चालवणे धोक्याचे झाले आहे. काही महिन्यातच रस्त्याची अवस्था अतिशय वाईट झाली. रस्त्याचे काम करताना ठेकेदाराने सिमेंटचा वापर केला होता की, नाही अशी शंका निर्माण होईल अशी रस्त्याची स्थिती आहे. ज्या ठिकाणाहून उड्डाणपूल सुरू होणार आहे त्याच ठिकाणी दोन्ही बाजूचे सेवारस्ते खड्ड्यात गेले आहेत. एखादे लहान वाहन रस्त्यावरून गेले तरी धूळ उडते. दिवसा धुळीतून प्रवास करताना वाहनचालकांची कसरत होते. रात्री या ठिकाणी विजेची व्यवस्था नाही त्यामुळे धुळीतून मार्ग काढताना अपघाताचा धोका वाढला आहे. उड्डाणपुलाच्या खाली खासगी वाहने, अवजड वाहतुकीची वाहने, जेसीबी उभे केले जातात. या सर्व वाहनचालकांना या धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.
---
चौकट
टॅंकरने पाणी मारण्याची मागणी
या भागात हॉटेल आणि काही सदनिका आहेत. त्यांनाही धुळीचा त्रास होत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे नागरिकांनी धुळीसंदर्भात तक्रार केल्यानंतर चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या एजन्सीने टॅंकरने पाणी मारून नागरिकांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला. पावसाळा संपल्यानंतर धुळीच्या त्रासात वाढ झाली आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने पुन्हा टॅंकरने पाणी मारण्यास सुरुवात करावी, अशी मागणी केली जात आहे.
--------------
कोट
बहादूरशेख नाका येथे सुरू असलेले चौपदरीकरणाचे काम व त्या ठिकाणी होणारी सततची वाहतूक यामुळे दिवसभर धूळ उडत असते. परिणामी, रस्त्याशेजारी असलेल्या दुकानदार व नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. कंत्राटदाराने आपल्या नियोजित वेळेतच उड्डाणपुलाचे काम पूर्ण करावे. सेवारस्ते चांगले करावेत.
-अजय शिंदे, ग्रामस्थ, कळंबस्ते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

