विजेचा कमी दाब; उपकरणांची हानी

विजेचा कमी दाब; उपकरणांची हानी

Published on

03596

विजेचा कमी दाब; उपकरणांची हानी

कुडाळात महावितरण धारेवर; भरमसाठ बिले येतातच कशी?

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १० ः शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विजेच्या समस्यांमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. सर्व प्रभागांमध्ये विजेचा कमी दाब (लो व्होल्टेज), वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, जळणारी उपकरणे आणि वाढीव वीजबिल यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या सर्व समस्यांकडे महावितरणकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गट आणि युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांनी केला. महावितरणचे अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांची भेट घेत या समस्या सोडविण्याची मागणी केली.
शहरातील अनेक ठिकाणी विजवाहिन्यांना गार्डिंग नसल्याने आणि वेली चढल्याने शॉर्टसर्किटचा धोका आहे. गांधी चौकातील समादेवी मंदिराजवळील खांबाजवळ वाहन पार्किंगमुळे संभाव्य अपघाताचा धोका आहे. या भागांची प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी मंदार शिरसाट आणि सुशील चिंदरकर यांनी केली. बैठकीत नागरिकांनी वाढीव वीजबिलांविषयी तक्रारींचा पाढा वाचला. बिल अचानक वाढते, हेल्पलाइन नंबर लागत नाही, आणि वसुली मात्र जबरदस्तीने होते. काही ठिकाणी घरात कोणी नसताना मीटर बसवले जात आहेत, असा आरोप मेघा सुकी, सुशील चिंदरकर आदींनी केला.
शहरात बसविलेल्या स्मार्ट मीटरमुळे वाढीव बिलांचा त्रास होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. माजी आमदार वैभव नाईक यांनी स्मार्ट मीटरचे कमी बिल दाखवा आणि १० हजार बक्षीस मिळवा’ असा फलक लावला होता; मात्र अजूनही कोणीच बक्षीस मिळविले नाही. हेच लोकांच्या संतापाचे निदर्शक आहे, असे श्री. शिरसाट म्हणाले. यावेळी माजी नगरसेविका मेघा सुकी, तालुका प्रमुख कृष्णा धुरी, तसेच सुशील चिंदरकर, अमित राणे, संदीप महाडेश्वर, सत्यवान काबळी, विनय पालकर, भुषण कुडाळकर, रोहित शिरसाट, शुभम महाडेश्वर आदी उपस्थित होते.
----
अभियंत्यांकडून मागणीची दखल
दरम्यान, अभियंता अभिमन्यू राख यांनी समस्यांची दखल घेत नवीन ट्रान्सफॉर्मर उपलब्ध असल्यास तातडीने बसविण्यात येईल, ग्राहकांवर कोणताही आर्थिक ताण येणार नाही, जुना ट्रान्सफॉर्मर बदलायचा असल्यास नगरपंचायतीचे पत्र आवश्यक आहे. पुढील १५ दिवसांत शहरातील सर्व ट्रान्सफॉर्मरचे लोडिंग तपासले जाईल. ८० टक्के पेक्षा अधिक लोड असलेले ट्रान्सफॉर्मर नियोजनबद्ध बदलले जातील, एलटी कंडक्टर आठ दिवसांत बदलण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्याचे सांगितले.
-------------
फ्युज लोंबकळत; मोठा धोका
कुडाळ आंबेडकरनगर पुतळ्याजवळील मेन कनेक्शनचे फ्युज लोंबकळत पडलेले असून, तिथे विजेचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.
नागरिकांनी तातडीने पाहणी करून दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. एखादा अपघात झाला तर जबाबदार कोण? असा थेट सवाल श्री. शिरसाट यांनी अधीक्षक अभियंत्यांना केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com