जायंट आफ्रिकन स्नेल
-rat१०p३०.jpg-
२५O०३५९२
रत्नागिरी : येथे आढळलेली गोगलगाय जायंट आफ्रिकन स्नेल.
----
रत्नागिरीत आढळली परदेशी गोगलगाय
प्रजाती पूर्व आफ्रिकेतील; पर्यावरणाच्या बदलाचा परिणाम, पर्यावरणतज्ज्ञांचे मत
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : शहरातील थिबा पॅलेस रोडवरील आकाशवाणी केंद्राच्या संरक्षक भिंतीवर ''जायंट आफ्रिकन स्नेल'' (गोगलगाय) आढळली आहे. रत्नागिरीमध्ये अशा प्रजातीची पहिलीच गोगलगाय आढळली आहे. हा परदेशी प्रजातीचा शंखप्राणी आहे. पर्यावरणीय बदलांमुळे हा प्राणी रत्नागिरीत आढळला असावा, असे मतद पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केले.
‘जायंट आफ्रिकन स्नेल’ या शंखप्राण्याचे शास्त्रीय नाव ‘अचाटिना फुलिका’ आहे. ही प्रजाती मूळची पूर्व आफ्रिकेतील असून, उष्ण व ओलसर दमट हवामानात अत्यंत वेगाने वाढते आणि झपाट्याने प्रजनन करते. रत्नागिरीमध्ये दमट किनारी भागातील हवामान या प्रजातीच्या वाढीसाठी अनुकूल आहे. त्यामुळे तिचे संक्रमण होऊ शकते, असे मत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाच्या डॉ. प्रा. मधुरा मुकादम यांनी व्यक्त केले.
या गोगलगायीचे वैशिष्ट्य म्हणजे अँजिओस्ट्राँगिलस कॅन्टोनेन्सिस नावाच्या परजीवी कृमीचा वाहक असू शकतो. हा परजीवी मानवाच्या शरीरात गेल्यास मेंदूज्वरासारखा आजार होऊ शकतो. संक्रमित शंखप्राणी हाताळताना किंवा त्याच्याशी थेट संपर्क आल्यास दूषित स्रावामुळे संक्रमणाचा धोका वाढतो. त्यामुळे या गोगलगायीला हात लावू नये, असे आवाहन पर्यावरणतज्ज्ञांनी केले आहे. स्थानिक गोगलगायी किंवा सूक्ष्मजीवांच्या अधिवासावर हल्ला करतात. यामुळे पर्यावरण संतुलनावर परिणाम होण्याचा धोका आहे. पर्यावरणातील बदलामुळे हा प्राणी येथे आढळल्याचे पर्यावरणतज्ज्ञांचे मत आहे. त्यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात व रत्नागिरीतील दापोली येथे या प्रजातीचा शंखप्राणी सापडला होता. निसर्गाच्या चमत्कारामुळे अनेक प्रकारचे दुर्मिळ प्राणी, जीव आढळत असतात.
------
चौकट १
अशी असते गोगलगाय
‘जायंट आफ्रिकन स्नेल’ या गोगलगायीचे शरीर लांबट असते. अंगावर तपकिरी पट्टेदार कवच असून, लांबी १० ते २० सेंटीमीटर आहे. ही गोगलगाय मुख्यतः वनस्पतींच्या हिरव्या भागांवर उपजीविका करते आणि त्यामुळे शेती, पिकांचे नुकसान होते. गोगलगाय रोगकारक जंतू वाहून नेत असल्यामुळे मनुष्य व पाळीव प्राण्यांच्या आरोग्यावर तिचा परिणाम होऊ शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

