आदर्श कार्यकर्त्यांच्या योगदानाचा सन्मान
swt116.jpg
03703
कुडाळ ः ‘केपीएल’ महोत्सवात आदर्श कार्यकर्ता पुरस्कार सन्मानप्रसंगी रणजित देसाई, जगदीश वालावलकर, अनिल आंबेस्कर. (छायाचित्र ः अजय सावंत)
आदर्श कार्यकर्त्यांच्या योगदानाचा सन्मान
‘केपीएल २०२५’ महोत्सवः विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरणप्रसंगी गौरव
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ११ः गौड ब्राह्मण सभा संकल्पित कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आयोजित केपीएल २०२५ च्या क्रीडा महोत्सवात विविध क्रीडा प्रकारांत देशभरातून ८५० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. यावेळी १० वर्षे कामगिरी केलेल्या समाजाच्या कार्यकर्त्यांना ''आदर्श कार्यकर्ता'' म्हणून सन्मानित करण्यात आले. या सर्वांना विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरणप्रसंगी गौरविण्यात आले.
''केपीएल २०२५'' क्रीडा महोत्सव गेले तीन दिवस कुडाळ हायस्कूल मैदान आणि बॅ. नाथ पै शिक्षण संस्था येथे विविध क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी पार पडला. सर्व स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा कुडाळ हायस्कूल मैदानावर पार पडला. यावेळी कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण समाज प्रतिष्ठान अध्यक्ष रणजित देसाई, जगदीश वालावलकर, ''केपीएल'' संघटक मनीष दाभोलकर, सारस्वत बँकेचे अनिल आंबेसकर, का. आ. सामंत, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, संदीप सामंत, मैथिली सामंत, राजन नाईक, पप्पू नाईक, प्रसाद नाईक, केदार सामंत, प्रशांत धोंड, प्रफुल्ल वालावलकर, अभय वालावलकर, संजय नाईक, अतुल सामंत, प्रदीप नेरुरकर, रोहन देसाई, मनोज वालावलकर, अभय सामंत, सचिन देसाई, तृप्ती प्रभूदेसाई, विपुल प्रभू, श्रीकृष्ण सामंत, साहिल देसाई, सागर नाईक, मनोज तेंडुलकर, अमित तेंडुलकर, स्वानंद सामंत, ओंकार देसाई, अरुणा सामंत, स्वाती वालावलकर, उमा नाईक, विजय प्रभू आदी उपस्थित होते.
विविध स्पर्धांचा निकाल अनुक्रमे असा ः नन्हे कुडाळदेशकर-५० मीटर धावणेमध्ये सात्विक सामंत (वेंगुर्ले), श्लोक सामंत, स्मित सामंत (परुळे). बेडूक उड्या-सात्विक सामंत, हिमांशू प्रभुदेसाई, स्वराज तेंडुलकर. ११ ते १७ वयोगट चमचा लिंबू-
स्वराज नाईक, शुभ्रा परुळेकर, अन्यन्या ठाकूर. १०० मीटर धावणे-स्वराज नाईक, सार्थ सामंत, स्वराज देसाई. रांगोळी स्पर्धा-निशिगंधा तेंडोलकर, मेधा सामंत. निबंध नन्हे-कौस्तुभ परुळेकर, अमृता सामंत, कृतिका देसाई. मोठा गट-नेहा नाईक व अंजली सामंत, सुवर्णलता वालावलकर, अमृता प्रभू, विद्याधर सामंत, श्रध्दा पाटकर. बुद्धिबळ पुरुष-विजेता मिलिंद सामंत, उपविजेता अक्षय वालावलकर. महिला विजेती मनाली देसाई, उपविजेती अपर्णा सामंत. बॅडमिंटन एकेरी पुरुष-साईराज सामंत, जयदीप प्रभू. महिला-श्रेया सामंत, दिया पाटकर (बेळगाव). दुहेरी विजेता जयदीप प्रभू, अनिकेत वालावलकर, उपविजेता विशाल वालावलकर, सच्चिदानंद नाईक. महिला दुहेरी विजेत्या श्रेया सामंत व संतोषा नाईक, उपविजेती यामा नेरुरकर व संध्या सामंत. मिक्स दुहेरी विजेती श्रेया सामंत व साईराज सामंत, उपविजेता अनिकेत वालावलकर व यामा नेरुरकर. कॅरम एकेरी पुरुष-विजेता सागर ठाकूर (कुडाळ), उपविजेता कमलेश देसाई (विरार). कॅरम दुहेरी विजेते-संकेत ठाकूर व रोहन देसाई (कुडाळ), उपविजेते कमलेश देसाई व विश्वेश सामंत (विरार). मिक्स दुहेरी विजेता-संकेत ठाकूर व अपर्णा सामंत (कुडाळ), उपविजेता सागर ठाकूर व माधुरी देसाई (बोरिवली). महिला एकेरी-विजेती कविता वालावलकर (दोडामार्ग), उपविजेती संपदा देसाई (ठाणे), दुहेरी प्रथम अचला सामंत (अर्नाळा) व रुक्मिणी गाळवणकर (अर्नाळा), द्वितीय चित्रा खानोलकर (गोरेगाव) व संपदा देसाई (ठाणे).
चौकट
‘आदर्श कार्यकर्ता’ सन्मानाचे मानकरी
केपीएल महोत्सव महाराष्ट्रसह गोवा, कर्नाटकमध्ये गेली दहा वर्षे सुरू होता. या दहा वर्षांच्या कालावधीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा ''आदर्श कार्यकर्ता'' म्हणून सन्मान करण्यात आला. यामध्ये नागेश पाटील, योगेश खानोलकर, रोहन देसाई, विकास वाघ, दिलीप खानोलकर, स्वानंद सामंत, स्नेहा वालावलकर, डॉ. प्रणव प्रभू, श्रीकृष्ण सामंत, तृप्ती देसाई यांचा समावेश होता. या सर्वांना आदर्श कार्यकर्ता तर निधी संकलन पुरस्काराने समाजाचे क्रीडा संघटक मनीष दाभोलकर यांना सन्मानित करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

