चिपळूण-चिपळूण, संगमेश्वरातील ११४ वाड्या स्वखर्चाने प्रकाशमान

चिपळूण-चिपळूण, संगमेश्वरातील ११४ वाड्या स्वखर्चाने प्रकाशमान

Published on

ratchl११२.jpg-
03753
चिपळूणः सहकाऱ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. सचिन शिगवण.
----------------
चिपळूण, संगमेश्वरातील
११४ वाड्या प्रकाशमान
चिपळूण, ता. ११ ः चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यांतील ग्रामीण भागात विकासाचा नवा प्रकाश पसरला आहे. ३१० सौर पथदिव्यांच्या स्थापनेद्वारे १२ गावांतील ११४ वाड्यांचे मोफत शाश्वत विद्युतीकरण यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे. या अभिनव उपक्रमामुळे ग्रामस्थांच्या जीवनात सुरक्षितता, प्रकाश आणि आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
डॉ. सचिन शिगवण यांनी स्वखर्चातून हा प्रकल्प उभारून ग्रामीण विकासाला हातभार लावला आहे. हा प्रकल्प टीयुव्ही-एसयुडी, निर्मिती फाउंडेशन आणि ग्रीन इंडिया इनिशिएटिव्ह प्रा. लि. यांच्यावतीने राबवण्यात आला. भारतात ‘दी सोलार मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे डॉ. सचिन शिगवण यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात आहे. या प्रकल्पांतर्गत चिपळूण तालुक्यातील मांडकीखुर्द, पालवण, आगवे, वीर, देवपाट, तोंडली, नायशी, वडेरू आणि पेढांबे ही गावे तसेच संगमेश्वर तालुक्यातील आंबव, नारडुवे आणि शिरंबे ही गावे सहभागी होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com