रत्नागिरी-गणपतीपुळेत समुद्रकिनाऱ्यावरील जीवरक्षक वाढवा

रत्नागिरी-गणपतीपुळेत समुद्रकिनाऱ्यावरील जीवरक्षक वाढवा

Published on

rat11p21.JPG-
03741
गणपतीपुळे ः समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना जयगड पोलिस निरीक्षक संजय पाटील.
--------------
गणपतीपुळेत समुद्रकिनाऱ्यावरील जीवरक्षक वाढवा
संजय पाटील; दुर्घटना टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्र या
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ः गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरील स्थानिक व्यावसायिक, जीवरक्षक आणि ग्रामस्थांनी समुद्राच्या बदलत्या स्थितीची माहिती पर्यटकांना वेळोवेळी द्यावी. लहान मुलांना समुद्रात उतरू देऊ नये. समुद्रातील चाळ व खड्ड्यांची माहिती आगाऊ देऊन दुर्घटना टाळाव्यात तसेच समुद्रकिनाऱ्यावर पोलिस कर्मचाऱ्यांची गस्त कायम ठेवण्यात येणार असून, दर शनिवार, रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी अतिरिक्त गस्त वाढवण्यात येईल. तसेच ग्रामपंचायतीने जीवरक्षकांची संख्या वाढवण्याबाबत तातडीने पावले उचलावीत, अशा सूचना जयगड पोलिस निरिक्षक संजय पाटील यांनी दिल्या आहेत.
प्रसिद्ध धार्मिक पर्यटनस्थळ गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे सुरक्षा धोक्याचे प्रमाण वाढत असल्याने जयगड पोलिस ठाण्याच्यावतीने गणपतीपुळे देवस्थान सभागृहात झालेल्या विशेष बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत समुद्रकिनाऱ्यावरील स्थानिक व्यावसायिक, जीवरक्षक, देवस्थानचे सुरक्षारक्षक, ग्रामसुरक्षा दल सदस्य, पोलिस पाटील तसेच ग्रामस्थ सहभागी झाले होते. या सर्वांना पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सतर्क राहण्याचे आणि समुद्रकिनाऱ्यावरील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक पाटील यांनी केले.
गेल्या काही आठवड्यांत गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक बुडण्याच्या घटना वाढल्या आहेत. ऑक्टोबरमध्ये पुणे जिल्ह्यातील तर नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईतील पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला याशिवाय रायगड जिल्ह्यातील हमरापूर (पेण) येथील ३५ वर्षीय पर्यटक अद्याप बेपत्ता आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. या बैठकीला संस्थान श्री देव गणपतीपुळेचे सरपंच नीलेश कोल्हटकर, पंच डॉ. श्रीराम केळकर, विद्याधर शेंडे, मालगुंड गणपतीपुळे पोलिसचौकीचे उपनिरीक्षक संदीप साळवी, उपसरपंच संजय माने उपस्थित होते.

चौकट
सर्व यंत्रणांनी एकत्र काम करावे
गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरील भक्त आणि पर्यटकांची सुरक्षितता हेच प्रमुख ध्येय ठेवून पोलिस, ग्रामपंचायत, देवस्थान समिती व स्थानिक नागरिकांना सहकार्याची विनंती केली आहे तसेच सर्व यंत्रणांनी एकत्र काम केल्यासच दुर्घटनांना आळा घालता येईल, असेही पोलिस निरीक्षक पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com