रत्नागिरी-प्रस्तावित एमआयडीसीच्या भूसंपादनासाठी  2300 कोटीची गरज

रत्नागिरी-प्रस्तावित एमआयडीसीच्या भूसंपादनासाठी 2300 कोटीची गरज

Published on

एमआयडीसीच्या भूसंपादनासाठी २३०० कोटींची गरज
निवेंडी, रिळ-उंडी, वाटद आदींचा समावेश; बेरोजगारांना मिळणार रोजगार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : औद्योगिक विकासाच्यादृष्टीने रत्नागिरीत मोठे पाऊल राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून उचलले गेले आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात निवेंडी, रिळ-उंडी, विस्तारित रिळ आणि वाटद येथे एमआयडीसी प्रस्तावित आहे. त्याच्या भूसंपादनासाठी जवळपास २३०० कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. यामध्ये संरक्षण विभागाचा मोठा प्रकल्प होणार असून मॅन्गो, काजूपार्क प्रकल्पही येऊ घातला आहे. येणाऱ्या या प्रकल्पांमधून हजारो बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार मिळणार आहे.
या प्रकल्पांसाठी आवश्यक जागांचे भूसंपादन सुरू आहे. यातील निवेंडी, रिळ-उंडी येथे एमआयडीसीने भूसंपादन सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. येथील जागेसंदर्भात डीपीआर तयार करण्याचे काम सुरू आहे. स्क्रुटिनी करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयात प्रकरणे पाठवली आहेत. या दोन ठिकाणी जवळपासून ३१४ हेक्टरांहून अधिक जागेचे संपादन होणार असून, त्यासाठी ३५० कोटींची आवश्यकता आहे. मागील दीड वर्षापासून यावर एमआयडीसी विभागाकडून काम सुरू आहे. रिळ येथे अधिक ७२ हेक्टर जागेची आवश्यकता असून, त्यासाठी ८० कोटींची आवश्यकता आहे. वाटद एमआयडीसीसाठी आतापर्यंत ९०४ हेक्टर जागेची मोजणी पूर्ण झाली आहे. त्यासाठी ६६० कोटी लागणार आहेत. याच ठिकाणी आणखी एक हजार हेक्टरची आवश्यकता आहे. या चारही एमआयडीसीसाठी जवळपास २३०० कोटींची आवश्यकता आहे. रिळ-उंडी व निवेंडीसाठी आवश्यक निधीची बजेट तरतूद मात्र २०२६-२७ मध्ये केली नाही.

कोट
जिल्ह्यात नवीन प्रकल्प येऊ घातले आहेत. या उद्योगांमधून हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पांच्या भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधीची मागणी वरिष्ठ कार्यालयात करण्यात आली आहे.
-वंदना करमाळे, एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी, रत्नागिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com