स्थानिक लोकप्रतिनिधींनी चाकरमान्यांना न्याय द्यावा
swt126.jpg
03930
मुंबई ः प्रगत सिंधुदुर्ग मुंबई संस्थेच्या सभेत बोलताना अध्यक्ष दयानंद चौधरी. सोबत सत्यवान रेडकर, सूर्यकांत बागवे व इतर मान्यवर.
स्थानिक लोकप्रतिनिधींनी चाकरमान्यांना न्याय द्यावा
दयानंद चौधरीः मुंबईत ‘प्रगत सिंधुदुर्ग मुंबई’ संस्थेची वार्षिक सभा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १२ः स्थानिक राजकीय नेते, लोकप्रतिनिधी यांनी चाकरमान्यांच्या प्रकरणांना न्याय देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहावे, असे आवाहन प्रगत सिंधुदुर्ग मुंबई या मंडळाचे अध्यक्ष दयानंद चौधरी यांनी केले.
प्रगत सिंधुदुर्ग मुंबई संस्थेची वार्षिक सभा मंडळाचे अध्यक्ष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली हेटकरी भंडारी मंडळ दादर पश्चिम येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली. सभेच्या सुरुवातीस संस्थेच्या माध्यमातून श्री चौधरी यांनी, चाकरमान्यांची विविध कामे मार्गी लावल्याबाबत सुरेश पांचाळ, महादेव लाड, अनिल तांडेल, प्रमोद राणे, अॅड. आरती गवंडे, सुविधा गोवेकर, कादंबरी गवंडे, शैलेश धुरी यांचे संस्थेच्या वतीने आभार मानले. जॉन्सन लिफ्ट कंपनीचे फायनान्स ऑफिसर सूर्यकांत बागवे यांनी, आपल्या कंपनीमध्ये खात्रीने नोकरी देण्याकरिता आश्वासित केले. अध्यक्ष चौधरी यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. यामध्ये विविध सामाजिक उपक्रम, शेतकरी मेळावे, महिला बचतगट मेळावे, आरोग्य शिबिरे, वृद्धाश्रमांना मदत, आदिवासी शाळांना केलेली मदत असेल रुग्णांना आर्थिक मदत, पूरग्रस्तांना केलेली मदत यांचा समावेश होता. भविष्यातही संस्थेच्या माध्यमातून हे काम असेच अविरत चालू राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी संस्था उपसचिव सतीश दळवी यांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीची स्थापना करण्यात आली. या सभेस घाडीगावकर समाजाचे अध्यक्ष मेघश्याम घाडीगावकर, एअर इंडिया लोकाधिकार समितीचे प्रशांत सावंत, हेटकरी भंडारी समाजाचे कार्यकारी मंडळ सदस्य भाई मांजरेकर व अन्य मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सभेचे प्रास्ताविक उपसचिव सतेज दळवी यांनी केले. आभार दयानंद चौधरी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष नाईक, सुरेश राऊळ, दिनकर परब, पांडुरंग गावडे, दीपक सरनोबत, महादेव लाड, देविदास सावंत, संभाजी मुणगेकर, अनिकेत रेवणकर, नंदकिशोर कांबळी, तुषार कांबळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

