दंडवतेंमुळेच कोकण रेल्‍वेचे स्वप्न साकार

दंडवतेंमुळेच कोकण रेल्‍वेचे स्वप्न साकार

Published on

03939

दंडवतेंमुळेच कोकण रेल्‍वेचे स्वप्न साकार

करंबेळकर ः कणकवलीत पुण्यतिथीनिमित्त ‘स्मृती वंदना’

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता.१२ ः ‘मधू दंडवते यांचा कोकण हा मूळ प्रांत नसतानाही त्‍यांनी कोकण रेल्‍वेची उभारणी व्हावी यासाठी अथक प्रयत्‍न केले. अर्थमंत्री असताना बजेटमध्ये तरतूद केली. त्‍यांच्यामुळेच कोकण रेल्‍वे सत्‍यात येऊ शकली,’ असे प्रतिपादन अशोक करंबेळकर यांनी केले. तसेच कोकण रेल्वे अस्तित्वात आल्यानंतरच इथल्या जनतेने त्‍यांना लोकसभा निवडणुकीत नाकारले ही बाब मला आणि दंडवतेंनाही उगली नाही, अशी खंतही त्‍यांनी व्यक्‍त केली.
कणकवली रेल्वे स्थानक येथे मधु दंडवते यांच्या २१ व्या पुण्यतिथीनिमित्त ‘स्मृती वंदना’ कार्यक्रम झाला. यात सामाजिक कार्यकर्ते, ज्‍येष्‍ठ पत्रकार अशोक करंबेळकर बोलत होते. ते म्‍हणाले. ‘अलिकडचे राजकारणी प्रत्येक गोष्टीत राजकारण पाहतात, पण मधु दंडवते यांचे तसे नव्हते. त्यांनी राजकारणाचा वापर समाजकारणाला गती मिळावी म्हणून केला. म्हणूनच साम्यवादी विचारसरणीची एन.आर.एम्.यू. ही कर्मचारी संघटना समाजवादी विचारसरणीच्या मधु दंडवते यांचे गेली २० वर्षे निस्पृहपणे स्मरण करते, ही बाब त्यांच्या मोठेपणाची साक्ष देते.’
विजय गावकर म्‍हणाले, ‘कोकण रेल्वेचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या मधु दंडवते यांचे स्मरण करणे हे प्रत्येक कोकणी जनतेचे, कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांचे आणि कोकण रेल्वेवर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांचे आद्य कर्तव्य आहे. या कार्यक्रमात कोकण रेल्वे मजदूर युनियनचे पदाधिकारी रमाकांत नाडकर्णी, तांत्रिक अधिकारी सुहास बावधनकर, मुख्य स्टेशन मास्तर आनंद चिपळूणकर यांनीही दंडवते यांच्या कार्याचा गौरवपूर्वक उल्लेख केला. कार्यक्रमाला कोकण रेल्वेचे संतोष बापट, प्रशांत तांबे, भाऊ चिरेकर, प्रमोद गुंडे, भाई परब, सचिन सरंगले, संतोष नारकर, संजय पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com