स्पर्धा नको, तिकीट मिळेल त्याचे काम करा
rat12p3.jpg-
03894
रत्नागिरी ः महायुतीच्या समन्वय बैठकीत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मार्गदर्शन केले.
----------------
महायुतीच्या समन्वय बैठकीत विजयाचा निर्धार
स्पर्धा नको, तिकीट मिळेल त्याचे काम कराः उदय सामंत
दृष्टिक्षेपात...
* माझ्या कार्यकर्त्यांची ही निवडणूक
* कार्यकर्ता नसेल तर आमची किंमत शून्य
* कार्यकर्ता लोकप्रतिनिधी होण्यासाठी आम्ही प्रचारात उतरणार
रत्नागिरी, ता. १२ : महायुती म्हणून आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित लढतोय. आजचा हा संकल्प मेळावा विजयाचा निर्धार मेळावा असून, ३ डिसेंबरला महायुतीचेच फटाके वाजतील. आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला, त्याचा बदला घ्यायची ही वेळ आहे. सर्वांनी एकदिलाने काम करा, एकमेकांतील स्पर्धा संपवून ज्याला तिकीट मिळेल त्याचे काम करा. माझ्या कार्यकर्त्यांची ही निवडणूक आहे. कार्यकर्ता नसले तर आमची किंमत शून्य आहे. माझा कार्यकर्ता लोकप्रतिनिधी झाला पाहिजे यासाठी आम्ही प्रचारात उतरत आहोत, असे मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.
नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षांची महायुतीसाठी स्वयंवर मंगल कार्यालय येथे महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी (ता. ११) रात्री झाली. या वेळी आमदार किरण सामंत, भाजपचे अशोक सचिन मयेकर, अमित केतकर, वहाळकर, सतीश शेवडे, अॅड. विलास पाटणे, वर्षा ढेकणे, शिल्पा मराठे, शिंदेसेनेचे बाबू म्हाप, शिल्पा सुर्वे, राहुल पंडित, विलास चाळके, बाप्पा सावंत, बंटी वणजू यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सामंत म्हणाले, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार नारायण राणे यांना युतीमध्ये समन्वय साधल्याबद्दल धन्यवाद देतो. हा संकल्प मेळावा विजयाचा निर्धार मेळावा असून, ३ डिसेंबरला महायुतीचेच फटाके वाजतील. आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला, त्याचा बदला घ्यायची ही वेळ आहे. यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करणे गरजेचे आहे. विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी एकोपा महत्त्वाचा आहे, एकमेकांतील गैरसमज दूर करून समन्वय साधावा. सचिन वहाळकर यांनी महायुतीचाच झेंडा दक्षिण रत्नागिरीत फडकणार, असे सांगितले. अशोक मयेकर यांनी भाजपचा कार्यकर्ता झुकणारा नाही. सर्व एकदिलाने काम करू, असे आश्वासन दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

