-खल्वायनच्या सभेत सावनी पारेकरांचे बहारदार गायन
-rat१२p२.jpg-
२५O०३८९३
रत्नागिरी ः खल्वायनच्या मासिक मैफलीत गाताना सावनी पारेकर. शेजारी संगीतसाथीला प्रथमेश शहाणे (तबला) आणि अमित ओक (संवादिनी)
------
सावनी पारेकरांचे बहारदार गायन
रत्नागिरी, ता. १३ : खल्वायन संस्थेच्या ३१९व्या मासिक संगीत सभेत मुंबईच्या गानहिरा पारितोषिक विजेत्या युवा गायिका सावनी पारेकर यांचे बहारदार गायन झाले. त्यांनी शास्त्रीय, उपशास्त्रीय तसेच अभंग-नाट्यगीतांच्या सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी मैफलीची सुरवात पुरीया रागातील विलंबित तिलवाडा तालातील ‘मलनिया गुंध लाओ’ या बडा ख्यालाने केली. त्यानंतर मध्यलयीतील एक बंदिश, एक तालातील तराणा व मिश्र खमाज रागातील दादरा सादर केला. शास्त्रीय गायनानंतर आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, राम होऊनी राम गा रे, विजयी पताका श्रीरामाची, त्या चित्त चोरट्याला ही बहारदार गाणी तसेच संगीत मत्स्यगंधा नाटकातील देवाघरचे ज्ञात कुणाला, संगीत भूमिकन्या सीतामधील मी पुन्हा वनांतरी ही नाट्यपदे गायली. प्रथमेश शहाणे यांनी तबलासाथ तर चिपळूण अमित ओक यांनी संवादिनीसाथ केली.

