अस्थमा एक गंभीर; पण टाळता येण्यासारखा आजार

अस्थमा एक गंभीर; पण टाळता येण्यासारखा आजार

Published on

आरोग्यभान ः वैयक्तिक-सार्वजनिक
(७ नोव्हेंबर टुडे ४)

अस्थमा किंवा क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव पल्मनरी डिसिज ही दक्षिण आशिया आणि महत्वाचे म्हणजे भारतातील एक खूप मोठी सार्वजनिक आरोग्यसमस्या बनलेली आहे. भारतात एकूण ५५ लाख केसेस आढळून येतात व मृत्यूचे महत्वाचे कारण आहे.
- rat१३p१.jpg -
25O04086
- डॉ. समीर दळवी, चिपळूण
फिजिशियन
----
अस्थमा एक गंभीर;
पण टाळता येण्यासारखा आजार

दमा ही एक मोठी सार्वजनिक आरोग्यसमस्या बनली आहे. आजकाल अस्थमा हा श्वसनसंस्थेशी संबंधित गंभीर आजार असून, त्याचे प्रमाण वाढत आहे. हा आजार मुख्यतः फुप्फुसांतील श्वासनलिका (airways)आणि फुप्फुसांच्या ऊतींवर परिणाम करून श्वास घेण्याची क्षमता कमी करतो. हा आजार हळूहळू वाढत जातो त्यामुळे त्याची वेळेवर जाणीव होणे आणि उपचार सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे.

* अस्थमा (COPD) म्हणजे काय? - अस्थमामध्ये श्वासनलिकांमध्ये सूज येते आणि त्या अरुंद होतात. परिणामी, फुप्फुसांमध्ये हवा नीट जाऊ शकत नाही व बाहेरही सहज निघत नाही. त्यामुळे रुग्णाला दम लागणे, खोकला, घशात कफ आणि थकवा अशा तक्रारी जाणवतात.

* अस्थमाची मुख्य कारणे पुढीलप्रमाणे:
- धूम्रपान (सिगारेट, बीडी, हुक्का इ.)
- घरातील धूर-चूल, लाकूड, शेणाचे गोळे यावर स्वयंपाक करताना तयार होणारा धूर.
- औद्योगिक प्रदूषके व धूळ - खाणी, कारखाने, बांधकामस्थळे अशा ठिकाणी सतत धूळ व धुराशी संपर्कात येणे .
- पर्यावरणातील वायूप्रदूषण.
- बालवयात झालेल्या टीबीमुळे फुप्फुसाची कमजोरी
- अनुवंशिक

* या आजाराची सर्वसाधारण लक्षणे पुढीलप्रमाणे:
- सततचा खोकला
- जास्त प्रमाणात कफ
- हलक्या कामातही श्वास लागणे
- छातीत जडपणा
- सतत थकवा
- श्वास घेताना घरघर

वरील लक्षणे दीर्घकाळ जाणवत असतील तर त्वरित फुप्फुस तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

* निदान कसे केले जाते?
एक्स-रे, सीटी स्कॅन व काही आवश्यक रक्ततपासण्यांद्वारे या आजाराचे निदान करता येते. फुप्फुसांची कार्यक्षमता मोजण्यासाठी स्पायरोमेट्री चाचणीसुद्धा केली जाते.

* उपचार आणि व्यवस्थापन - अस्थमा पूर्णपणे बरा होणारा असा आजार नाही; परंतु योग्य उपचारांनी लक्षणांवर नियंत्रण ठेवता येते.
- इन्हेलर किंवा नेब्युलायझर – श्वासनलिका खुल्या करण्यासाठी.
- औषधे – सूज कमी करण्यासाठी.
- फुप्फुस पुनर्वसन – श्वासोच्छ्वास सुधारण्यासाठी विशेष व्यायाम.
- ऑक्सिजन थेरपी – गंभीर रुग्णांसाठी.
- धूम्रपान त्वरित थांबवणे – अत्यंत महत्त्वाचे.

* टाळावयाच्या गोष्टी:
- स्वतः धूम्रपान करणे तसेच अतिधूम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या सतत सहवास
- जास्त धूळ किंवा धूर असलेल्या ठिकाणी राहणे, काम करणे
- थंडीतील प्रदूषित हवा

उपाययोजना:
- घरात स्वयंपाकासाठी धूररहित चूल किंवा गॅस वापरणे.
- धूळ, धूर आदी ठिकाणी मास्कचा वापर करणे
- आरोग्यदायी आहार, नियमित व्यायाम
- वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे.

* सार्वजनिक आरोग्यावर परिणाम व उपाय
- दमा या प्रदीर्घ आजाराचा संसाधनावर प्रचंड भार पडत असतो व त्याचे आर्थिक पडसाद कुटुंबाला सोसावे लागतात. हे जर कमी करायचे असेल व यावर परिणामकारक काम व्हायला हवे तर बहुआयामी पावले उचलावी लागतील, जसे प्रदूषण रोखणारी धोरणे, तंबाखू प्रतिबंधनात्मक पावले व शीघ्र निदान व उपचारासाठी बळकट प्राथमिक आरोग्ययंत्रणा तसेच प्रभावी उपचार व त्याचा खर्च सर्वांना परवडेल अशी बनवणे.
अस्थमा हा दुर्लक्षित राहिल्यास जीवघेणा ठरू शकणारा आजार आहे; परंतु आरोग्यदायी आहार, नियमित व्यायाम, योग्यवेळी निदान, योग्य उपचार, धूम्रपानमुक्त जीवनशैली आणि स्वच्छ पर्यावरणामुळे या आजारावर नियंत्रण ठेवता येते. तेव्हा स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या.

(लेखक चिपळूण येथील प्रसिद्ध फिजिशियन आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com