विद्यार्थीभिमुख उपक्रमांना पूर्ण सहकार्य
swt135.jpg
04122
कुडाळ ः चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांसमवेत उद्योजक कौसर खान, राजू पाटणकर, गणेश भोगटे, स्वप्नाली सावंत व अन्य मान्यवर. (छायाचित्र ः अजय सावंत)
विद्यार्थीभिमुख उपक्रमांना पूर्ण सहकार्य
कौसर खानः कुडाळमध्ये चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १३ः आरोग्य क्षेत्रातील डॉ. प्रमोद वालावलकर यांचे कार्य विसरता येणार नाही. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे उपक्रम राबविणे आवश्यक आहे. या चित्रकला स्पर्धेतील विद्यार्थांचा उत्साह उल्लेखनीय होता. विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या उपक्रमांना पूर्ण सहकार्य राहील, असे प्रतिपादन कुडाळ एमआयडीसी येथील उद्योजक कौसर खान यांनी केले. येथे आयोजित तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. एकूण ३९२ विद्यार्थांनी सहभाग घेतला.
आरोग्य क्षेत्रातील जनसामान्यांचे देवदूत डॉ. प्रमोद वालावलकर यांच्या हितचिंतक मित्रमंडळींच्या वतीने व श्री देवी केळबाई उत्सव मंडळाच्या सहकार्याने येथील श्री देवी केळबाई मंदिरात (कै.) प्रमोद वालावलकर स्मृती प्रित्यर्थ तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी चार गटात स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेदरम्यान आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व स्पर्धक विद्यार्थांना सहभाग प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. श्री देवी केळबाई उत्सव मंडळाचे अध्यक्ष नारायण उर्फ बंड्या केळबाईकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. उद्योजक कौसर खान यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार, तर लाजरी क्रिकेट ग्रुप (कुडाळ) अध्यक्ष राजू पाटणकर यांच्या हस्ते श्री देवी सरस्वती मातेच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. नगरसेवक गणेश भोगटे, माजी नगराध्यक्षा अक्षता खटावकर, श्री केळबाई उत्सव मंडळाचे उदय कुडाळकर, कृष्णा पाटकर, कृष्णा घाडी, सुहास राऊळ, नंदू राऊळ, दादा पाचेकर, स्पर्धेचे मार्गदर्शक व सेवानिवृत्त केंद्रप्रमुख धोंडू रेडकर, कुंभारवाडा शाळेच्या उच्चश्रेणी मुख्याध्यापिका स्वप्नाली सावंत, सहाय्यक शिक्षिका सायली कदम, शिक्षक गुरुप्रसाद सावंत, शिक्षिका चैत्राली पाटील व अश्विनी सावंत, श्री केळबाई उत्सव मंडळाचे रुपेश राऊळ, प्रसाद वाडयेकर, आबा घाडी, अनंत खटावकर, संतोष केळबाईकर, सना राऊळ व शैलेश घाडी यांची प्रमुख उपस्थिती होती
चित्रकार व रांगोळीकार केदार टेमकर (सरंबळ), विष्णू माणगावकर (झाराप), प्रसाद नाईक (बिबवणे) यांचा सन्मान करण्यात आला. मान्यवरांचे स्वागत कॉम्प्युटर इंजिनिअर पंकज गोसावी यांनी, सूत्रसंचालन स्पर्धा प्रमुख नागेश नाईक यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी धोंडू रेडकर, नागेश नाईक, केदार टेमकर, पंकज गोसावी, पद्माकर वालावलकर, प्रसाद मेस्त्री, नीलेश पेडणेकर, सचिन गडेकर, कृष्णा मेस्त्री, विद्यानंद कुमठेकर, देवेंद्र परब, भरत मेस्त्री, ओंकार मडवळ, प्रसाद टेमकर, प्रसाद नाईक, संदीप गडेकर यांच्यासह श्री देवी केळबाई मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, कुंभारवाडा शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षकांनी मेहनत घेतली.
राजू पाटणकर, कौसर खान, जालमसिंह पुरोहित यांचे सहकार्य लाभले. डॉ. वालावलकर यांच्या पत्नी प्रज्ञा वालावलकर, शिवसेना ठाकरे गटाचे कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, लाजरी क्रिकेट ग्रुपचे राजेश म्हाडेश्वर, विस्तार अधिकारी (पंचायत समिती) महादेव खरात, चित्रकार रजनीकांत कदम यांनी स्पर्धेला भेट देत शुभेच्छा दिल्या. युवा चित्रकार केदार टेमकर यांनी फलक लेखनातून साकारलेली डॉ. वालावलकर आणि आई केळबाई देवीची सुबक कलाकृती लक्षवेधी ठरली. केळबाई देवीच्या मंदिरात व कुंभारवाडा शाळेत स्पर्धा झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

