शेळी पालनाने दाखविला यशाचा मार्ग

शेळी पालनाने दाखविला यशाचा मार्ग

Published on

-rat१३p१७.jpg-
२५O०४१५२
पावस ः साई कदम यांच्या शेळीपालनाची पाहणी करताना डॉ. किरण मालशे, डॉ संतोष वानखेडे.
----
काही सुखद---लोगो

शेळीपालनाने दाखवला यशाचा नवा मार्ग
शेतकरी साई कदम; भातशेतीसह पूरक व्यवसायातून अर्थार्जन
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १३ ः कोकणातील शेतकरी म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर येतो तो भात उत्पादक किंवा आंबा, काजू व नारळ बागायतदार. गेल्या काही वर्षांमध्ये येथील शेतकरी पारंपरिक शेतीच्या जोडीला शेतीपूरक व्यवसाय करून चांगले अर्थार्जन करू लागले आहेत. रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे येथील शेतकरी साई कदम यांनी व्यवसायातून यशाचा मार्ग दाखवला आहे. हा आदर्श सर्वांनी घेतल्यास भविष्यात चांगल्याप्रकारे शेतीपूरक व्यवसाय होऊ शकतो.
पूर्वी कोकणात शेळीपालन व्यवसाय फक्त येथील धनगर समाजापुरताच मर्यादित होता. येथील धनगर समाजातली माणसं माळरानावर शेळ्या चरवत आणि त्यातून प्राप्त होणाऱ्या अर्थावर उदरनिर्वाह करत. आता हा व्यवसाय शेतकरी शेतीला जोडधंदा किंवा शेतीपूरक व्यवसाय म्हणून करून त्यांच्यासाठी शाश्वत उत्पन्नाचे साधन ठरला आहे.
कोळंबे येथील कदम यांच्या कुटुंबात त्यांचे आई-वडील व मोठी बहीण. त्यांचे वडील रिक्षाचालक होते व पारंपरिक पद्धतीने भातशेती करत. अल्पजमिनीतून पारंपरिक शेतीवर अवलंबून राहून घर चालवणं कठीण होत. त्यामुळे २०१४ मध्ये दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाने विकसित केलेल्या कोकण कन्याळ जातीच्या केवळ दोन शेळींपासून शेळीपालन व्यवसायास सुरुवात केली. त्यांच्याकडे १५ ते २० शेळ्यांचा कळप कायम राखला जातो. ईदसारख्या सणांना आजुबाजूच्या गावांमध्ये बकऱ्यांची विक्री होते. या व्यवसायातून त्यांना प्रतिवर्षी २ ते २.५ लाखांचे उत्पन्न प्राप्त होते. या व्यवसायाने त्यांना आर्थिक उन्नती प्राप्त करून देऊन त्यांचे जीवनमान उंचावले.

चौकट
शेळीच्या लेंडी खताला मागणी
शेळीपालनावर आधारित त्यांनी २०१४ मध्ये विविध प्रशिक्षणे घेतली. त्यांनी राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण शेळीपालन योजनेचा लाभ घेऊन शेळी खरेदीवर ५० टक्के अनुदान मिळवले. शेळ्यांच्या मांसाबरोबरच त्यांच्या लेंडीलाही शेतीमध्ये फार महत्व आहे. त्यामध्ये सरासरी १.३ टक्के नत्र, ०.५ टक्के स्फुरद आणि १.५ टक्के पलाश आढळतं. त्यामुळे शेळीच्या लेंडीला भर खत म्हणून वापरासाठी भरपूर मागणी आहे.

चौकट
संकरातून हवामानास प्रतिकारक शेळ्यांची निर्मिती
उस्मानाबादी आणि सिरोही जातीच्या शेळ्या आणल्या आणि व्यवसाय वाढवला. त्यांनी उंचवट्यावर पारंपरिक पद्धतीने मचाण बांधून शेळीपालनास सुरुवात केली; परंतु कोकणातल्या पावसाळी, जास्त आर्द्रतेच्या वातावरणात त्या तग धरू शकत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले; मात्र कोकणातल्या स्थानिक जातीही वातावरणात फारशा तग धरत नव्हत्या. त्यांचे वजन, वाढ कमी होते म्हणून त्यांनी स्थानिक जातींचा बोअर, सिरोही, हैदराबादी, कोटासारख्या जातींचा संकर करून वाढीस चांगल्या व हवामानास प्रतिकारक शेळ्या उत्पन्न केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com