१९ हजाराच्या ठेवीवर पालिकेची मुहूर्तमेढ
निवडणूक पानासाठी
swt1121.jpg
सावंतवाडी पालिका
मालिकेचे नाव ः प्रवास सावंतवाडीच्या कारभाराचा (भाग-३)
१९ हजाराच्या ठेवीवर पालिकेची मुहूर्तमेढ
प्रतिकुल परिस्थितीत स्थापनाः खडतर आव्हाने पेलत साधली प्रगती
शिवप्रसाद देसाईः सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ११ः अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत आणि अवघी १९ हजाराची ठेव असताना १९३० मध्ये सावंतवाडीत नगरपालिकेची स्थापना करण्यात आली. साथीच्या रोगाने पूर्ण शहर उध्वस्त होण्याच्या मार्गावर होत. वार्षिक खर्च ७ लाखापर्यंत पोहोचला होता. अशा खडतर स्थितीत १९३० मध्ये शहर व्यवस्था मंडळ कायदा करून प्रत्यक्षात आलेली पालिका आज जिल्ह्यातील प्रमुख स्थानिक स्वराज्य संस्थापैकी एक बनली आहे.
सिटी वहीवाट खात्याकडे कारभार असताना १९२३-२४ या आर्थिक वर्षात उत्पन्न १४६०० वर पोहोचले होते. २० वर्षात केवळ ५ ते ६ हजाराची वाढ झाली होती; मात्र आव्हाने वाढली होती. शहरात १९१८ मध्ये इन्फ्यूएन्झाची साथ आली. त्या पाठोपाठ मलेरियाचे मोठे संकट लोकांच्या मुळावरच उठले. १९०१ च्या दरम्यान १०२१२ असलेली लोकसंख्या १९२१ ला ७९४४ वर पोहोचली. कित्तेक घरांमधील सगळेच सदस्य मृत्यूच्या अधिन झाले. घरे पडली. नवी घरे बांधली जात नव्हती. १९०१ मध्ये असलेली घरांची १४३८ ही संख्या १९२३ मध्ये १३७९ वर आली. जन्म (१९२) आणि मृत्यू (२३२) याचे प्रमाण विषम झाले. उत्पन्नाच्या तुलनेत खर्चाचे प्रमाण वाढले. याच कालावधीत १९३० मध्ये शहर व्यवस्थामंडळ कायदा अमलात आणण्यात आला. त्यावेळी पालिकेकडे अवघ्या १९ हजाराची ठेव सुपुर्त करण्यात आली.
कारभार लोकांकडे सुपुर्त करणारा कायदा आला असला तरी फार कमी लोकांना मताधिकार होता. यातच उमेदवार होण्यासाठीची पात्रता अनेक कठीण कसोट्या पार केल्यानंतर ठरत होती. त्यामुळे प्रत्येक प्रभागात मतदारांची संख्या ३० ते ४० इतकीच असायची. त्यातून उमेदवार शोधणे खूप कठीण होते. यामुळे पहिल्याच निवडणुकीत जागान इतके उमेदवारी अर्जही दाखल होईनात. अखेर त्या काळातील जागृत नागरीक असलेले जेष्ठ पत्रकार मे. द. शिरोडकर, वकील शांताराम माद्रेकर यांच्यासह हरी आपा सबनिस, गोविंदशेठ केसरकर यांनी पुढे येत स्वतः अर्ज भरले किंवा त्यासाठी पुढाकार घेतला.
पुढे पालिकेविषयीच्या कायद्यामध्ये सुधारणा होत गेली. मतदारसंख्या वाढली. उत्पन्नही वाढत गेले. १९४८ मध्ये संस्थानचे विलीनीकरण झाले. त्यानंतर भारतीय कायदे आणि कार्यपध्दती पालिकेला लागू झाले. यानंतर डिस्ट्रीक्ट म्यूनिसीपल अॅक्ट प्रमाणे कामकाज चालायला लागले. प्रौढ मतदान पध्दत आल्याने मतदारसंख्या आणखी वाढली. पालिकेच्या क्षेत्राचाही विस्तार झाला. यामुळे पालिका क्षेत्रातील लोकसंख्याही वाढत गेली. १९४१ च्या जनगननेनुसार ही संख्या १२१०७ इतकी होती. १९४८-८९ या वर्षात पालिकेचे उत्पन्न १ लाख ३० हजार ८०९ आणि खर्च १ लाख ४३ हजार ५७९ इतका होता.
चौकट
कोण होते पहिले अध्यक्ष ?
पहिली काही वर्षे अध्यक्ष सरकारनियुक्त असायचे. पालिकेचे पहिले नगराध्यक्ष म्हणून काझी अब्दूल रझाक यांची नियुक्ती झाली होती. ते मुंबईत क्रॉफर्ड मार्केटमध्ये तपासणी अधिकारी होते. दिलदार, आतिथ्यशील, सुस्वभावी असल्याने त्यांनी आपली ओळख निर्माण केली. पुढे सभासदांना आपला अध्यक्ष निवडण्याचा अधिकार मिळाला. मताधिकार ठरवण्याचे निकष बदलत गेले. त्यामुळे मतदार संख्या वाढत गेली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

