पावस शाळेत पथनाट्य

पावस शाळेत पथनाट्य

Published on

पूर्णगड शाळेत
पथनाट्य सादर
पावस ः महाराष्ट्र एनसीसी नेव्हल युनिटतर्फे कोकण विजय सागरी नौकाभ्रमण मोहिमेंतर्गत पूर्णगड शाळा नं. १ मध्ये विविध उपक्रम सादर करण्यात आले. स्वच्छ, सुंदर, समृद्ध कोकण यावर आधारित उत्तम पथनाट्य सादर करण्यात आले. त्यानंतर रॅली काढून पर्यावरण जागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांना संघभावना, शिस्त, साहसीवृत्ती या विषयी माहिती देण्यात आली. शिडाची जहाजे, विविध बोटी यांचे कार्य कसे चालते याबाबत सांगण्यात आले. या वेळी आलेले अधिकारी, एनसीसी कॅडेट यांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका भारती तायशेटे, शिक्षक पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर, तृप्ती शिरगावकर यांनी केले.

सह्याद्री महाविद्यालयात
दोन दिवसांचे चर्चासत्र
संगमेश्वर ः सावर्डे येथील सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट येथे प्रख्यात चित्रकार, शिक्षक आणि लेखक संतोष मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाइन चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. याचे उद्‍घाटन बुधवारी (ता. १२) झाले. मोरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना चित्रकलेतील कल्पनाशक्तीचे महत्त्व, रचना आणि रंगसंगतीचा सर्जनशील वापर तसेच कलाकाराने स्वतःची ओळख कशी निर्माण करावी यावर मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या कलाप्रवासातील प्रेरणादायी अनुभवही विद्यार्थ्यांसोबत शेअर केले. वेबिनारच्या दुसऱ्या दिवशी चित्रकलेतील नव्या तंत्रज्ञानाचा वापर, डिजिटल आर्टचे वाढते महत्त्व आणि कलेच्या माध्यमातून समाजाशी संवाद या विषयांवर चर्चा झाली.

तेली समाजबांधवांशी
संवाद मेळावा
रत्नागिरी ः तालुका तेली समाजसेवा संघाच्यावतीने रत्नागिरी तालुक्यातील तेली समाजातील बांधवांशी संपर्क साधून संवाद साधण्यात येत आहे. बुधवारी (ता. १२) सायंकाळी सोमेश्वर येथील वरची तेलीवाडीतील एकनाथ हरचिरकर यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली. बैठकीला सोमेश्वर, मळीवाडी, शेलारवाडी, काजरघाटी आजूबाजूच्या परिसरातील जास्तीत जास्त तेली समाजबांधव उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते सुहास चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. तालुकाध्यक्ष सचिन लांजेकर, जिल्हा खजिनदार दिनेश नाचणकर, कार्याध्यक्ष दीपक राऊत, जिल्हाध्यक्ष रघुवीर शेलार यांनी तालुक्यात राबवण्यात येत असलेले उपक्रम, संघटना मजबूत होऊन सर्वांनी एकत्र येऊन काम करणे कसे गरजेचे आहे. ओबीसी म्हणजे काय आणि त्यांचे हक्क व अधिकार काय आदींबाबत माहिती दिली. रत्नागिरी शहराजवळ सर्व तेली समाजासाठी तेली समाजभवन उभारले जात आहे. त्याबाबत माहिती देण्यात आली. बैठकीला जिल्हा सचिव संदीप पवार, नारायण झगडे, प्रमोद भडकमकर, सेवा आघाडीचे काशिनाथ सकपाळ, तालुका संपर्क प्रतिनिधी राजेश हरचिरकर, परेश रहाटे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com