कुडाळात भाजपकडून
बिहार विजयाचा जल्लोष

कुडाळात भाजपकडून बिहार विजयाचा जल्लोष

Published on

O04376

कुडाळात भाजपकडून
बिहार विजयाचा जल्लोष

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १४ ः बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) एकहाती सत्ता मिळवत मोठा विजय मिळवला. या विजयानंतर शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयासमोर जल्लोष करीत फटाक्यांची आतषबाजी व जोरदार घोषणाबाजी केली.
बिहारमध्ये एनडीए आणि महाआघाडी यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीत एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवून विजयी बाजी मारली. एनडीएमध्ये भाजप, जदयू, लोकजनशक्ती पार्टी (रामविलास), राष्ट्रीय लोकमोर्चा आणि हिंदुस्तानी अवाम मोर्चा (सेक्युलर) या पक्षांचा समावेश होता. महाआघाडीत राजद, काँग्रेस, विकसनशील इंसान पार्टी, तसेच सीपीआय, सीपीएम आणि सीपीआय (एम-एल) या डाव्या पक्षांचा सहभाग होता. या ऐतिहासिक विजयानंतर कुडाळ शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांसह जोशपूर्ण घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी भाजप राज्य परिषद सदस्य राजू राऊळ, जिल्हा उपाध्यक्ष बंड्या सावंत, संध्या तेरसे, रुपेश पावसकर, महिला आघाडीच्या अदिती सावंत, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष तन्मय वालावलकर, कुडाळ शहराध्यक्ष सुनील बांदेकर, विशाखा कुलकर्णी, माजी नगरसेवक सचिन काळप, माजी नगराध्यक्ष आफरीन करोल, नारायण शृंगारे, सुनील सातार्डेकर, योगेश राऊळ, दिगंबर गोवरकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com