कडवईत श्रमदानातून बांधला बंधारा

कडवईत श्रमदानातून बांधला बंधारा

Published on

-rat१५p४.jpg-
२५O०४४९३
संगमेश्वर ः कडवई येथे बंधारा बांधताना ग्रामस्थ.
----
कडवईत श्रमदानातून बांधला बंधारा
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर ः मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने कडवई ग्रुपग्रामपंचायत हद्दीत ग्रामस्थांच्या लोकसहभागातून व श्रमदानातून धामणाकवाडी येथील विहिरीशेजारी बंधारा बांधण्यात आला व विहिरीचा परिसर साफसफाई करण्यात आला. या अभियानांतर्गत कडवईत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायत हद्दीतील धामणाकवाडी येथील पाणीपुरवठा विहिरीशेजारी ग्रामस्थांनी श्रमदान करत बंधारा बांधला तसेच विहिरीच्या आजूबाजूचा परिसर स्वछ करण्यात आला. या बंधाऱ्यामुळे या विहिरींची पाणीपातळी ही समतोल राहणार असून, तुटवड्याच्या काळात ग्रामस्थांना याचा चांगला फायदा होणार आहे. या वेळी सरपंच विशाखा कुवळेकर, ग्राम अधिकारी राहुल चौधरी, उपसरपंच दत्ताराम ओकटे, ग्रामपंचायत सदस्य अक्षता घरवेकर, आयडियल ग्रुपचे अध्यक्ष नीलेश कुंभार आदी उपस्थित होते.

---
अंगणवाड्यांमध्ये
शिवसेनातर्फे बालदिन
संगमेश्वर ः पंडित जवाहरलाल नेहरू जयंतीनिमित्त संगमेश्वर येथील नावडी, रामपेठ आणि संभाजीनगर परिसरातील अंगणवाड्यांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शिवसेना विभागप्रमुख वैभव मुरकर, उपविभाग संघटक सिद्धेश सावंत, शाखाप्रमुख सूरज सुर्वे, शिवसैनिकांनी सहभागी होत तिन्हीही अंगणवाडीतील बालकांचे स्वागत केले आणि त्यांना दिल्या. सर्व बालकांना खाऊवाटप करून आनंददायी वातावरण निर्माण करण्यात आले. रामपेठ अंगणवाडीच्या मदतनीस शीतल अंब्रे यांनी बालदिनाचे महत्त्व स्पष्ट करत मुलांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते दिनेश अंब्रे उपस्थित होते.

आर्या, विवेक यांची
प्रश्नमंजूषेसाठी निवड
गुहागर ः रत्नागिरी जिल्हा गणित अध्यापक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धेत श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरचे आर्या गोयथळे व विवेक बाणे या जोडीने प्रथम क्रमांक पटकावला. त्यांची जिल्हास्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा तालुक्यातील पाटपन्हाळे इंग्लिश स्कूलमध्ये घेण्यात आली. परीक्षेसाठी तालुक्यातील आठ शाळांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये आर्या व विवेक या जोडीने प्रथम क्रमांक पटकावला.

‘वेलदूर नवानगर’मध्ये
शैक्षणिक साहित्यवाटप
गुहागर ः वेलदूर नवानगर शाळेत बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त भारत पेट्रोलियम कंपनी आणि राजलक्ष्मी ऑटोमोबाईल्स यांच्याकडून मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊवाटप करण्यात आला. कंपनीचे अधिकारी अरविंद सिंग म्हणाले, विद्यार्थ्यांच्या जीवनात बालदिनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. यापुढेही आपण शाळेला सर्वतोपरी सहकार्य करू. या वेळी सरपंच दिव्या वनकर, राजलक्ष्मी ऑटोमोबाईल्स पेट्रोलपंपाचे केतन वनकर, ग्रामपंचायत सदस्य प्राजक्ता जांभारकर, मारुती रोहिलकर, युवानेते मनोज पावस्कर, मुख्याध्यापक मनोज पाटील, पदवीधर शिक्षक नीलेश पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com