मालवण पालिकेसाठी आणखी सहा उमेदवार
04542
मालवण पालिकेसाठी
आणखी सहा उमेदवार
अर्ज दाखल ः राजकीय पक्षांचे शक्तिप्रदर्शन
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १५ : येथील पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आजच्या सहाव्या दिवशी सहा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. उद्या (ता. १६) शिंदे शिवसेना व भाजपकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत.
आज प्रभाग क्रमांक एक ‘अ’ मधून भाजपचे मंदार केणी, प्रभाग क्रमांक दोन ‘अ’ मधून अपक्ष सिद्धेश मांजरेकर, प्रभाग क्रमांक चार ‘अ’ मधून काँग्रेसच्या गणेश पाडगावकर, चार ‘ब’ मधून ठाकरे शिवसेनेच्या वृंदा गवंडी, प्रभाग पाच ‘अ’ मधून ठाकरे शिवसेनेचे महेंद्र म्हाडगुत, प्रभाग क्रमांक सहा ‘अ’ मधून भाजपच्या गणेश कुशे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यकांत पाटील, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रतीक थोरात आदी उपस्थित होते.

