-विजयदुर्ग किल्ल्यावर एनसीसी कॅडेट्स
-rat१५p१७.jpg-
२५O०४५४५
आंबोळगड : एनसीसीच्या कोकण विजय सागरी नौकाभ्रमण मोहिमेत बोटी वल्हवत नेताना एनसीसी छात्र.
-rat१५p१८.jpg-
२५O०४५४६
विजयदुर्ग : आयएनएस गुलदार या जहाजाची माहिती घेताना एनसीसी छात्र.
-rat१५p१९.jpg-
P२५O०४५४७
विजयदुर्ग: विजयदुर्ग किल्ला येथे मेनू २०२६ शिबिरातील छात्र.
----
कोकण विजय मोहिमेत स्वच्छतेचा संदेश
विजयदुर्ग किल्ल्याला एनसीसी कॅडेट्सची भेट; नौकानयन, वारसा ओळखसह सामाजिक उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ : महाराष्ट्र नेव्हल युनिट एनसीसी रत्नागिरीच्या कॅडेट्सनी मेनू २०२६ कॅम्पदरम्यान कोकण विजय मोहिमेअंतर्गत विविध पर्यटनस्थळांना भेट देत स्वच्छतेचा संदेश दिला. या सागरी नौकाभ्रमण मोहिमेअंतर्गत रत्नागिरी, रनपार, पूर्णगड, आंबोळगड, धाऊलवल्ली आणि विजयदुर्ग येथे स्वच्छ कोकण-सुंदर कोकण हा संदेश देण्यासाठी जनजागृती उपक्रम राबवण्यात आले.
नौकानयन, नकाशावाचन, शस्त्रप्रशिक्षण, प्राथमिक वैद्यकीय मदत, आपत्कालीन परिस्थिती हाताळणी यांसोबतच समुद्रकिनारा स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनावर आधारित उपक्रम राबवण्यात येत आहेत. कॅडेट्सनी भारतीय नौदलातून निवृत्त झालेले जहाज आयएनएस एक्स - गुलदार, ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला व परिसरातील महत्त्वाच्या सांस्कृतिक स्थळांना भेट दिली. समुद्रीसुरक्षा, देशाच्या नौदल इतिहासाची ओळख व वारसा संवर्धनाचे महत्त्व कॅडेट्सना या दौऱ्यातून प्रत्यक्ष अनुभवता आले. या जहाजावर कॅडेट्सना जहाजरचना, नौदलातील शिस्त आणि समुद्री मोहिमांदरम्यान वापरली जाणारे विविध तांत्रिक साधने यांची माहिती मिळाली.
कॅडेट्सनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामरिक बुद्धिमत्तेचे प्रतीक मानला जाणारा विजयदुर्ग किल्ला पाहिला. किल्ल्याच्या बांधकाम कौशल्याबरोबरच समुद्री व्यापार व संरक्षणात त्याची भूमिका या विषयी मार्गदर्शकांनी सविस्तर माहिती दिली. विजयदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी तसेच आयईएस शाळेत सादर केलेले सामाजिक संदेशात्मक पथनाट्य, पर्यावरण संवर्धन, प्लास्टिकमुक्त परिसर, पर्यटनस्थळांची स्वच्छता व स्थानिक नैसर्गिक संपत्तीचे जतन याबाबत जनजागृती केली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भारतीय नौदलाचे अधिकारी, आयईएस शाळा व्यवस्थापन, गावकऱ्यांनी सहकार्य केले. या उपक्रमामुळे कॅडेट्समध्ये देशप्रेम, वारसा जतनाची जाणीव व सामाजिक बांधिलकी अधिक दृढ झाल्याचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
चौकट १
स्थानिकांचा प्रतिसाद
कॅडेट्सनी सागरी प्रदूषण नियंत्रण, किनारपट्टी संरक्षण आणि नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन याबाबत शपथ घेतली. राज्यभरातील विविध महाविद्यालयांमधून आलेल्या एनसीसी कॅडेट्सनी स्थानिक समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छ कोकण सुंदर कोकण ही जनजागृती मोहीम राबवली. स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्थांनीही याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

