-क्राईम

-क्राईम

Published on

कामाच्या कारणावरून
एकास मारहाण
रत्नागिरी ः तालुक्यातील कळझोंडीफाटा येथे काम करण्याच्या कारणावरून प्रौढाला दोघांनी मारहाण केली. संशयितांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल चव्हाण, सुनील पवार (दोन्ही रा. विजापूर, कर्नाटक) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. ही घटना २९ जून २०२५ सायंकाळी कळझोंडीफाटा येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अशोक धनसिंग पवार (४०, मुळ ः कर्नाटक सध्या रा. वाटद खंडाळा, रत्नागिरी) हे आणि संशयित एकत्र काम बघण्यासाठी संगमेश्वर येथे गेले होते. परत येत असताना ते जाकादेवी येथे बारमध्ये एकत्र दारू प्यायल्यानंतर कामाच्या कारणावरून त्यांच्यात दारूच्या नशेत भांडणास सुरुवात झाली. त्यानंतर फिर्यादी हे आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना लघुशंकेसाठी थांबले असताना संशयितांनी भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी अशोक पवार यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी पवार यांनी शुक्रवारी (ता. १४) नोव्हेंबरला ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बोटीवरील खलाशाचा
आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी ः जयगड समुद्रात मच्छीमारी करणाऱ्या बोटीवर झोपलेल्या नेपाळी खलाशाची हालचाल होत नसल्यामुळे उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. रोहित जंगबहादूर चौधरी (४७, रा. कैलाला, नेपाळ) असे मृत्यू झालेल्या नेपाळी खलाशाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १४) पहाटे तीनच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत रोहित चौधरी हे बोटमालक नितीश तारानाथ नायक यांच्या बोटीवर कामाला होते. गुरूवारी (ता. १३) ला जयगड येथील समुद्रात मच्छीमारी करत असताना बोटीवरील खलाशी रोहित चौधरी हा रात्री नऊ वाजता जेवण आटोपल्यावर बोटीवरील केबिनमध्ये झोपला होता. त्यानंतर शुक्रवारी पहाटे बोट मच्छीमारी करून मिरकरवाडा बंदरात आली तेव्हा बोटीवरील फोरमन राजेश धनिराम डंगौराने बोटीच्या केबिनमध्ये झोपलेल्या रोहित चौधरीला हाक मारून उठवले; परंतु तो उठला नाही म्हणून त्याने केबिनमध्ये जाऊन त्याला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला असता त्याची कोणतीही हालचाल होत नव्हती. याबाबत राजेश डंगौराने बोटमालक नितीश तारानाथ नायक यांना माहिती दिली. त्यांनी मिरकरवाडा बंदरात येऊन रोहितला उपचारांसाठी रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com