कंपनीत चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चार जणांना अटक

कंपनीत चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चार जणांना अटक

Published on

-rat१५p६.jpg-
२५O०४४९५
देवरूख ः कंपनीत चोरीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चौघा संशयितांसह पोलिस.
----
कंपनीत चोरीप्रकरणी चौघांना अटक
साडवलीतील प्रकार ; पोत्यावरील नावावरून शोध
सकाळ व
साडवली, ता. १५ ः संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथील वनाज इंजिनिअर्स लिमिटेड कंपनीत चोरट्यांकडून मोठ्या चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. सुमारे अडीच लाखांचा ऐवज घेऊन जाण्याची तयारी चोरट्यांनी केली होती; मात्र सुरक्षारक्षकाच्या जागरूकतेमुळे त्यांनी पळ काढला. पळताना सोडलेले साहित्य व इतर पुरावे पोलिसांच्या हाती लागले आणि त्यावरून देवरूख पोलिसांनी जलदगतीने तपास सुरू केला. यामध्ये चौघांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
सायले शिंदेवाडी येथील विलास पुरोहित यांनी देवरूख पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शुभम संजय जोयशी, दीपक सुभाष गुरव, आदित्य बळीराम भेरे व प्रदीप चंद्रकांत गुरव या चारजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ११ नोव्हेंबरच्या रात्रीपासून १२ नोव्हेंबरच्या सकाळपर्यंतच्या कालावधीत हा प्रकार घडला. चोरट्यांनी कंपनीच्या भिंतीवरून उतरून गॅस बँक विभागातील लोखंडी दरवाजा उघडत आत प्रवेश केला. कंपनीतील जंक्शन ब्लॉक, फोजिंग, ड्रम, कट असे विविध स्पेअरपार्ट्स गोणत्यांमध्ये भरून सुमारे २ लाख ४५ हजार किमतीचे साहित्य बाहेर काढण्याचा त्यांचा प्रयत्न होता. एकूण १४ पोत्यांमध्ये १३०७ वस्तू, अंदाजे ४६५ किलो वजनाचे साहित्य त्यांनी तयार ठेवले होते.
ही पोती पळताना जागीच सोडून दिल्यामुळेच पोलिसांना तपासाचा धागा मिळाला. काही पोत्यांवर ‘दातार ट्रेडर्स’ असे लिहिलेले असल्याने संशयितांपर्यंत पोहोचणे अधिक सोयीचे झाले. पोलिसांनी तातडीने कारवाई करून चारही संशयितांना अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई हेडकॉन्स्टेबल सचिन कामेरकर, सचिन पवार, अभिषेक वेलवणकर, आर्या वेलवणकर व सचिन लगारे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com