चिपळूण नगराध्यपदासाठी आघाडीतच चुरस

चिपळूण नगराध्यपदासाठी आघाडीतच चुरस

Published on

चिपळूण नगराध्यक्षपदासाठी आघाडीतच चुरस
माजी आमदार कदमांसह तिघांचे अर्ज दाखल ; नगरसेवकपदासाठी २६ अर्ज
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १५ ः चिपळूण पालिकेच्या निवडणुकीसाठी आता रंगत वाढली आहे. महाविकास आघाडीतील दोन नेते आमदार भास्कर जाधव व माजी आमदार रमेश कदम निवडणूक अर्ज भरण्यासाठी एकत्र पाहायला मिळाले. नगराध्यक्षपदासाठी कदमांनी अर्ज दाखल करताना जाधवांनी पाठिंबा दिला; मात्र महाविकास आघाडीत नगराध्यक्षपदासाठी तिघांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सध्यातरी आघाडीत बिघाडी असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे तीन उमेदवारांमध्ये स्पर्धा आहे.
चिपळूण पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी अथवा महायुतीत एकवाक्यता आलेली नाही. त्यामुळे सर्वच पक्षांनी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज भरण्याचा पवित्रा घेतला आहे. आघाडी व महायुतीमध्ये इच्छुकांमध्ये समझोता होईल व त्यानंतर आवश्यक त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेता येतील; मात्र युती किंवा आघाडीची गणित फिसकटले तर स्वबळावर निवडणूकही लढता येईल, असे दोन्ही पर्याय राजकीय पक्षांनी समोर ठेवले आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्जांची संख्या वाढणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास दोन दिवस मुदत शिल्लक असताना चिपळुणात नगराध्यक्षपदासाठी आज तिघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये शरद पवार राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम, काँग्रेसकडून तालुकाध्यक्ष लियाकत शाह तर ठाकरे गटाकडून दुसऱ्यांदा राजेश देवळेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
नगराध्यक्षपदासाठी एकूण चार उमेदवारांनी अर्ज दाखल झाले आहेत. याशिवाय आज नगरसेवकपदासाठी २६ अर्ज दाखल झाले. यामध्ये शिवसेनेकडून आमदार भास्कर जाधव यांची कन्या कांचन शिंदे रिंगणात उतरल्या आहेत. जुन्या चेहऱ्यांमध्ये मोहन मिरगल, राजू देवळेकर यांनी अर्ज भरले आहेत. ठाकरे शिवसेनेने विकी नरळकर, संकेत शिंदे, शैलेश टाकळे यांना संधी दिली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून वाजतगाजत निहार कोवळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
---
कोट
महाविकास आघाडीतील जे इच्छुक उमेदवार आहेत ते सर्वच येथे माझ्यामागे आहेत. त्यांना तीनपैकी एकच उमेदवार निवडून येईल याचे पूर्णपणे भान आहे. त्यामुळे तिघांत एकमत व्हायला वेळ लागणार नाही. ते एकमत आम्ही निश्चित करू.
-भास्कर जाधव, आमदार व शिवसेना नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com