रत्नागिरी शहरात पोलिसांचा रुट मार्च
rat16p22.jpg-
O04761
रत्नागिरी : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांची तपासणी करताना पोलिस.
----------
रत्नागिरी शहरात
पोलिसांचा रुट मार्च
रत्नागिरी, ता. १६ : आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस दलाने शहरातून रूट मार्च आणि विशेष वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे. शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रूट मार्च घेण्यात आला.
यामध्ये प्रभाग क्र. ६ व ७, नाचणे पॉवर हाऊस येथून सुरू होऊन सोमेश्वर किराणा स्टोअर, विश्वनगर कर्लेकरवाडी, आनंद नगर सद्गुरु बैठक मार्ग, नवीन भाजीमार्केट, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामागील परिसर, हिंदू कॉलनी आणि हिंदू कॉलनी प्रवेशद्वार, माळ नाका या मार्गांचा समावेश होता. या रूट मार्चमध्ये एकूण ३९ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. रूट मार्चनंतर रात्रीच्यावेळी कायदा अधिक कडक करताना शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व नाकाबंदी ठिकाणी विशेष वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली. रात्री १० ते ११ वाजेपर्यंत चाललेल्या या मोहिमेत एकूण ३० चारचाकी आणि १८ दुचाकी वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण सात हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

